लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕पालकमंत्री* *ना.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते व* *विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील* *पदाधिकारी यांच्या उपस्थितीत*
: ६ नोव्हेबर :
विलास सहकारी साखर कारखाना युनीट २, तोडार ता. ऊदगीरच्या गळीत हंगाम सन २१-२२ चा शुभारंभ सोमवार, ८ नोव्हेंबर २१ रोजी दुपारी १ वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास अध्यक्ष कारखान्याच्या चेअरमन मा.श्रीमती वैशाली विलासराव देशमुख राहणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख राहणार आहेत. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारातील सर्व संस्थाचे संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत हंगाम शुभारंभ होणार आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाला आहे, जिल्हयातील ऊसाचे क्षेत्र चांगले आहे. विलास कारखाना युनीट २ च्या कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता देखील चांगली आहे. कार्यक्षेत्रातील या सर्व ऊसाचे वेळेवर गाळप करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. कारखान्याने गळीत हंगाम यशस्वीतेसाठीची तांत्रिक काम चांगल्या पध्दतीने करण्यात आली आहेत. यासाठी लागणारी ऊसतोडणी-वाहतुक यंत्रणा पूर्णपणे भरली आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा हंगाम यशस्वीतेसाठी सज्ज झाली आहे. विलास साखर कारखाना युनीट २ तोडार ता. उदगीर येथील कारखाना गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रिणदपन सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दसरा (विजयादशमी) च्या मुहूर्तावर संपन्न झाला आहे.
कोवीड१९ प्रादूर्भाव अनुषंगाने सर्व नियम पाळून गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते, चेअरमन मा.श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख राहणार आहेत. तर माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्रिबंक भिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव राजेश्वर निटूरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणा सहकारी साखर कारखाना चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजुळगे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, जागृती शुगरचे व्हा. चेअरमन लक्ष्मणराव मोरे, व्हा.चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, रेणाचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य, टवेन्टिवनचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, व्हा.चेअरमन शाम भोसले, लक्ष्मीताई भोसले, मंजूरखां पठाण तसेच विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवारातील सर्व संस्थाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
विलास सहकारी साखर कारखाना युनीट २, तोडार कारखान्याच्या हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमास सभासद, शेतकरी, तोडणी-वाहतुक ठेकदार, कामगार सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हा. चेअरमन रविंद्र काळे, युनीट २ चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार व संचालक सर्वश्री माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले, निमंत्रीत संचालक रामराव बिरादार, कल्याण पाटील, मन्मथअप्पा किडे, सिध्देश्वर पाटील, ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विजय निटूरे, विक्रांत भोसले, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, संतोष तिडके, मारोती पांडे यांनी केले आहे.
—————–