लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– दिवाळी हा सण प्रकाशाचा, उत्साह आणि उमंगाचा सण आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या मोठी असून आदिवासी बांधव आपल्या संस्कृतीचे जतन करून दिवाळीमध्ये परंपरेचे आणि सांस्कृतीचे दर्शन घडवतात. सर्व आदिवासी बांधव एकोप्याने हा सण साजरा करतात. ग्रामीण भागात राहणारे सर्व शेतकरी शेतमजूर त्यांची उपजीविका ही फक्त शेतीवर असते. यावर्षी निसर्गाच्या अस्मानी आणि सुलतानी संकटात सुद्धा आदिवासी बांधव आपल्या संस्कृतीमध्ये रमून जाऊन दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. आदिवासी बांधव खूप प्रेमळ प्रामाणिकपणे सार्वजनिक जीवनात वावरताना दिसतात. त्यांचे साधे सरळ राहणे पाहून आपल्याला ग्रामीण संस्कृती विषयी आनखी प्रेम आणि आस्था निर्माण होते म्हणूनच काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी या वर्षीची दिवाळी परिसरातील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली. सुरुवाती पासूनच आदिवासी बांधवांबरोबर त्यांचा स्नेह जिव्हाळा कायम असून याच स्नेहपोटी त्यांनी भुरकुंडा बु तिथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.
या प्रसंगी आदिवासी समाजाचे नेते तथा सरपंच नामदेवराव कुमरे, महादेवराव ताजने, माजी उपसरपंच कळमना कवडु पाटील पिंगे सीताराम जी सिडाम, नानाजी पाटील पुसाम, गंभीरराव कुमरे, मारुती पाटील आत्राम, सुभाष पाटील पुसाम, विकास कुमरे, आकाश कुमरे यासह अनेक स्थानिक आदिवासी बांधव व गावकरी उपस्थित होते.