लोकदर्शन 👉मोहन भारती
⭕विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगारांचे आंदोलन
राजुरा___वेकोलीच्या पोवनी०२ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या सी.एम.पी. एल. कंपनीत सोमवारी कंत्राटी कामगारांच्या वतीने सकाळपासून विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आले.
राजुरा तालुक्यातील पोवनी०२ कोळसा खाणीत कोळसा खाणीतून माती व कोळसा काढण्याचे कंत्राट सी. एम.पी. एल. या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा केला आहे. नियमांना डावलून ही कंपनी कामगारांवर अन्याय करीत आहे. कामगारांच्या वेजबोर्ड निसार कंपनीने वेतन द्यावे,कामगारांच्या खात्यात कंपनीने वेतन करावे,वेतन स्लीप द्यावी,दिवाळी बोनस द्यावा,यासारख्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सी.एम.पी.एल.कंपनीत काम करणाऱ्या प्रफुल्ल गौरकर,अमित जगताप,शेखर पाचभाई,प्रवीण लोनगाडगे, किसन मडावी,अनिल शेंडे,विशाल इटकेलवार,श्रावण तेलकापल्लीवर,चिंटू जेऊरकर, सुदर्शन देवाळकर, शरद टाेंगे, किरण राजनवार,विजय नेवलकर,गजानन हनुमंते,प्रकाश अत्राम,नितेश चतुलवार,गुरुदास मडचापे,प्रकाश कोडापे,सुनील लांडे,प्रमोद थिपे,व इतर प्रकल्पग्रस्त गावातील कामगारांनी पोवनी०२ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या सी. एम.पी. एल. कंपनीसमोर कामबंद आंदोलन केले.जोपर्यंत कंपनी कामगारांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा पवित्रा कामगारांनी घेतला.सामाजिक कार्यकर्ते उमेश राजूरकर यांनी आंदोलनाला भेट देऊन कामगारांची व्यथा समजून घेतली.सायंकाळी वृत्त लिहीपर्यंत कामगारांचे आंदोलन सुरूच होते.