लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर:- रंजन सामाजिक मंचाच्या वतीने वेंडली येथील देशभक्त सुमन ताई बापूजी कोट्टे यांचा मुलगा भारतीय आर्मी तील जवान अभय कोट्टे व माता-पित्यांचा गौरव समारंभ पार पडला कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर मैंदळकर, सचिन बरबतकर, सुदर्शन नैताम, डॉक्टर राहूल विधाते, गंगाधर गुरुनुले, एडवोकेट धीरज ठवसे, गौरव आक्केवार, नितीन चांदेकर सुधाकर घोटेकर, पांडुरंग कोट्टे, किशोर जांपालवर, विजय कोट्टे उपस्थित होते सुमनताई बापूजी कोट्टे यांच्या मनात देशसेवा, देशप्रेम ओतप्रोत भरलेले आहे मुलं लहान असतानाच ठरविले होते एक मुलगा देश सेवेकरिता भारतीय सेनेत सैनिक म्हणून पाठवायचे व ते त्यांनी करून दाखविले अभय कोट्टे वेंडली येथील एकमेव सैनिक आहे हे वेंडली वासियासाठी अभिमानाची,गौरवाची बाब आहे.मार्गदर्शनात सुदर्शन नैताम म्हणाले देश सेवेच्या व्रताला समाजातील प्रत्येकाने प्रथम प्राधान्य द्यावे देश टिकला तर धर्म टिकेल व देशाची संस्कृती टिकून राहील देशावर जर संकट आले तर धर्म व संस्कृती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही त्याकरिता देशप्रेम देशसेवेचे धडे मुलांना बाल मनापासून रुजवायला पाहिजे ज्या देशाच्या नागरिकात देशप्रेम जाज्वल्य असते त्या देशाला कोणीही पराभूत करूच शकत नाही उदा इझराईल देश आहे
डॉ नंदकिशोर मैंदळकर म्हणाले शिवाजी महाराज,महाराणा प्रताप यांच्या अंतरातम्यात देशप्रेम होते त्यांनी देशाकरिता आपले सर्वस्व अर्पण केले त्यांनी भारत मातेचे येथील संस्कृतीचे रक्षण केले व मराठ्यांचा इतिहास दैदिप्यमान केला असे देशप्रेम प्रत्येक हिंदुस्थानी युवकांनी बाळगल्यास कुठल्याही देशाची हिंदुस्थान कडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत होणार नाही शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचा इतिहास बालकांना प्राथमिक शाळेपासून शिकवायला हवा तेंव्हा देशासाठी लढणारे वीर योद्धे तयार होतील व देशाला जागतिक कीर्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.कार्यक्रम स्थळी देश प्रेमाचे नारे लावण्यात आले उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.संचालन सचिन बरबतकर यांनी तर आभार गंगाधर गुरनुले यांनी मानले .