लोकदर्शन 👉 मोहन भारती
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले भुमीपुजन.
राजुरा (ता.प्र) :– नगर परिषद राजुरा क्षेत्रात वैशिष्ठ पूर्ण योजना आणि दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत एकुण ६ कोटी रुपये निधी च्या विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज पार पडले.
यात सकाळी ९ :३० वाजता रमानगर येथील बुध्दविहार परिसरात वैशिष्ठ पूर्ण योजने अंतर्गत प्रभाग क्र. ४ मध्ये ठिकठिकाणी सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे, सर्व्हे नं. १४९ / १९ ओपन स्पेसला सुधारीकर करणे, प्रभाग क्र. ४ मध्ये सर्व्हे नं. १४९/२३, १४२५ ओपन स्पेसला सुधारीकरण करणे १ कोटी ६३ लक्ष रुपये निधी, यानंतर १० : ३० वाजता इंदिरानगर येथे कब्रिस्थान /समशानभूमी साठी वॉलकंपाऊंड व गेट चे बांधकाम करणे ४० लक्ष रुपये निधी, यानंतर ११ : ३० वाजता देशपांडे वाडी येथे नगाजी महाराज हॉल जवळ सुर्वे यांचे घरासमोर पेवर्स लावणे १० लक्ष रुपये निधी, यानंतर १२ : ३० वाजता अमराई वॉर्ड येथे इंदिरा शाळा इमारत बांधकाम करणे १ कोटी २२ लक्ष रुपये निधी अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की राजुरा शहराला सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून या आधी सुद्धा आपण शहरातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि या पुढेही शहर विकासासाठी जेथे जेथे आवश्यकता पडेल तेथे सर्व प्रकारचे सहकार्य आपण नक्की करू. तर नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी शहरातील नागरिकांच्या सहकार्याने आपण राजुरा शहरातील विविध विकास कामे पूर्ण करीत असून यापुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण अविरत सेवा कार्य करीत राहू अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी पिदूरकर, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेविका दिपा करमनकर, वज्रमाला बतकमवार, गिता रोहने, उज्वला जयपूरक, दिपाली हिंगाणे, तालुका काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, सं. गां. नि. यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, अँड. चंद्रशेखर चांदेकर ,भारत रोहने, सुरेश आईटलावर , साबीर सय्यद, मतीन कुरेशी, सुनीता कुचनकर , संतोष कुळमेथे, अँड. सदानंद लांडे , प्राचार्य दौलत भोंगळे, विजय वाटेकर , बंडूभाऊ वाटेकर, सरपंच अॅड रामभाऊ देवईकर, आनंद चलाक, वामन वाटेकर, उमेश गोरे, आकाश वाटेकर, प्रणय लांडे, मटाले सर , ठावरी सर , भास्कर येसेकर , सागर लोहे, शब्बीर पठाण, मुख्याध्यापिका उज्वला पेंदे, खेडकर मॅडम, मांडवकर मॅडम, ठावरी मॅडम, सुर्वे मॅडम, पूनम गिरसावळे, योगिता मटाले, सुरेश मेश्राम, रवी त्रिशूलवार, दुर्गे सर, कुरेशी सर यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थीत होते.