लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕अनेक सरपंचांनी दिला पाठिंबा ;
गडचांदूर,,
– चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना ते वणी मार्गावरील चारगाव – ढाकोरी – कोरपना दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंगळवारपासून ढाकोरी बोरी येथे
मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचे नेतृत्वात आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. तिसऱ्या दिवशी सदर आंदोलन सुरूच असून आंदोलनाला मोठा पाठिंबा लाभत आहे.
कोरपना ते वणी हा दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख मार्ग आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यावर त्यांचे लक्ष वेधण्याकरिता आमरण उपोषण करण्यात येत आहे.जो पर्यंत रस्त्याची दुरुस्ती होणार नाही. तोवर आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, प्रवीण डाहुले, मंगेश दुरुटकर, प्रकाश कुंडेकर, निखिल मालेकर, सारंग येडे, अरविंद राजूरकर, मनोज ठावरी , सुरज डोहे याचा प्रमुख सहभाग आहे. या आंदोलनाला दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.