लोकदर्शन÷
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय जिवती यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्गात कला व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना covid-19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या अभियानांतर्गत महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेत असलेला व अठरा वर्ष पूर्ण केलेला कोणताही विद्यार्थी विना लसीचा राहू नये या स्पष्ट व स्वच्छ भूमिकेने प्रेरित होऊन, विदर्भ महाविद्यालय जिवती व ग्रामीण रुग्णालय जिवती यांच्या संयुक्त विद्यमानाने कोविड -19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर दिनांक 28 , 29 ऑक्टोबर 2021 रोजी महाविद्यालयात आयोजित केले आहे. तरी सर्व महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन, राष्ट्र निर्मिती, राष्ट्र सेवे करिता प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा. व लस घेऊन स्वस्त व सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. देशमुख यांच्या अथक परिश्रमाने व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शाक्य व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनकाडे यांच्या प्रेरणेतून साकार होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन लसीकरण करून देश सेवेकरिता सहकार्य करावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.