लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– सामाजिक क्षेत्र असो की व्यक्तिगत क्षेत्र असो माणसाने व्यक्तीपेक्षा विचाराला महत्त्व दिले पाहिजे. कारण विचारच माणसाला समोर नेत असतात असे विचार यंग टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.बबन तायवाडे यांनी व्यक्त केले. ते चंद्रपूर येथील मातोश्री सभागृहात झालेल्या गोंडवाना यंग टीचर असोसिएशनच्या प्राध्यापक मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी सत्कारमूर्ती नागपूरचे आमदार अॅड. अभिजित वंजारी, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. नंदकिशोर खत्री, गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप घोरपडे, गोंडवाना विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉ. विवेक शिंदे, अँड. विजय मोगरे, प्राचार्य सुर्यकांत खनके, डॉ. अनिल शिंदे,अँड. ह.मा. जांभुळे, श्रीकांत चहारे, संदीप गड्डमवार, सुनिता लोढीया, डॉ. सुरेश महाकुलकर,माजी आमदार देवराव भांडेकर मंचावर प्रामुख्याने विराजमान होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना एडवोकेट बंजारी म्हणाले, एकीचे बळ फार मोठे असते. कोणत्याही प्रकारचे पक्षभेद न करता आपण शिक्षकांच्या समस्यांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. भूपेश चिकटे, प्राचार्य दौलत भोंगळे, प्राचार्य डॉ.राजेश इंगोले, प्राचार्य डॉ.सुरेश मोहीतकर डॉ. प्रविण तेलखेडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रवीण तेलखेडे, प्रास्ताविक डॉ.प्रदीप घोरपडे, आभारप्रदर्शन डॉ. विवेक गोर्लावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय वाढई, डॉ. अक्षय धोटे, डॉ. सतीश कन्नाके ,डॉ.सुनील नरांजे ,डॉ. सुदर्शन दिवसे, डॉ.प्रशांत ठाकरे तथा संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.