Mahesh kadam mumbai
श्री. अरुण जनार्दन चव्हाण, रा.मु.पो.आंबोली, जकातवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. रहाणारे भूमीहीन अनुसूचित जातीतील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील व्यकती असुन सदर घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व
स्वामिमान योजना राबविण्यात आली व त्यासाठी अर्ज मागविण्यात आले.
सदर योजनेसाठी पात्र असल्याने जानेवारी-फेब्रुवारी २०१९ दरम्यान मा. समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे सदरच्या कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर अटी प्रमाणे २००७ नंतरचा कुटुंब प्रमुख असलेचा दारिद्र्य रेषेखालील दाखला सादर करणे बाबत सांगण्यात आले.
अरुण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ते २००२ मध्ये चुलत्यांच्या घरात विभक्त रहात होते. परंतु माझे नाव हे विभक्त कुटुंबप्रमुख म्हणुन स्वतंत्र दारिद्र्य रेषेचे यादीमध्ये नाही. त्यामुळे मला दाखला देण्यात आले नाही. सन २००२ नंतर दारिद्र्य रेषेखालील गणना झालेली नसल्याने सन २००७ नंतरची यादी हजर करता आलेली नाही.
मा. समाज कल्याण आयुक्त, यांचेकडुन माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीनुसार दि.१३/०३/२०२० ची पात्र लाभार्थी यादी निवडताना गटविकास अधिकारी यांनी दिलेले दाखले नसताना, २२ लाभार्थी हे सावंतवाडी शहरातील आहेत.
सदर लाभार्थी हे कुठेही शेती व्यवसाय करताना दिसत नाही. अशा लाभार्थींची पात्र यादीमध्ये निवड करण्यात आली. कुटुंब प्रमुख म्हणुन नाव नसलेले तसेच अनेक त्रुटी असलेले प्रस्ताव सुद्धा पात्र ठरविण्यात आलेले आहेत. लाभार्थी कुटुंबातील काही व्यकती या शासकीय व निमशासकीय तसेच ईतर ठिकाणी याआधी व सद्य परिस्थितीत नोकरी करीत आहेत. तसेच सलॅबची घरे, दुचाकी वाहने सुद्धा आहेत. त्यांच्याकडे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी दिलेले दाखले सुद्धा नाहीत. असे असताना मला व माझा भाऊ श्री. सुनील जनार्दन चव्हाण याला अपात्र ठरविण्यात आले. माझे कुटुंबातील कुणीही व्यकती कुठेही शासकीय व ईतर ठिकाणी नोकरी करत नाही. त्यांचा उदरनिर्वाह हा मोलमजुरी वरच आहे. आमचे कुटुंबातील कोणत्या ही व्यक्तीचे महाराष्ट्र बाहेर जमीन व नावं ही नाही. आम्ही भूमीहीन असताना व आमचे वार्षिक उत्पन्न हे अत्यंत तुटपुंजे असुन दारिद्र्य रेषेतील निकषामुळे गेली २० वर्षे विभक्त राहुन सुद्धा अपात्र ठरत आहोत.
दि. १२/१०/२० रोजी मा. पालकमंत्री यांच्या जनता दरबारात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेऊन मा. जिल्हा अधिकारी यांनी दि.२१/१०/२० रोजी मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांना चौकशी करून कार्यवाही करणे बाबत कळविलेली होते. परंतु अधिकारी व आयुक्त यांनी दि. ०५/११/२० रोजी खोडसाळ उतर देऊन दिशाभूल केली. दारिद्र्य रेषेखालील नोंद नसताना देखील कही व्यकतींना लाभ दिलेला असुन माझ्यावर अन्याय केला आहे. त्या संदर्भात माझ्या जवळ माहितीच्या अधिकारात घेतलेले पुरावे सुद्धा आहेत.
तसेच माहितीच्या अधिकारात व समाज कल्याण अधिकारी यांचा कडे मागणी करुन रोख रक्कम भरून सुद्धा सदर माहिती दिली नाही. सदरची माहिती लपवून ठेवण्यात आली. त्यामुळे न्याय मिळावा या साठी उपोषण छेडणयात आले. मा. पालकमंत्री व मा. जिल्हा अधिकारी यांनी भेट घेतली. मात्र संबंधित जबाबदार व्यकती त्या ठिकाणी आलेला नाही व चौकशी सुद्धा झाली नाही. मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी श्री. जयंत चाचरकर व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गोसावी यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून लोकांची दिशाभूल केलेली आहे. पात्र यादीमध्ये २२ लाभार्थींना उपलब्ध जमीन दाखवून त्यांचेकडुन प्रतिज्ञापत्र करून घेतलेले आहे.
माझ्या उपोषण संबंधित पोलिस अधिकारी यांचाकडुन कोरोना चा काळात उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. परंतु माझ्या अर्जा बाबत संबंधित खात्याकडून पुर्ण अनास्था दिसून येत आहे. या संदर्भात मी मा. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते विधानसभा, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, समाज कल्याण आयुक्त, समाज कल्याण सह-आयुक्त, जिल्हाअधिकारी, पोलिस अधीक्षक, ठाणे अंमलदार, माहितीचे अधिकारी यांना पत्र द्वारे सुचवले आहे. म्हणून मी मुंबई ला येऊन आजाद मैदान येथे उपोषण केले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रसार माध्यम यांना सुद्धा दिली तसेच राजकीय नेते तेथे येऊन मला या संदर्भात निहाय चौकशी करून, कायदेशीर कारवाई केली जाईल व पात्र यादीमध्ये नाव समाविष्ट करून योजनेचा लाभ दिला जाईल अशी खात्री देण्यात आली.