By : Mohan Bharti
लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.
राजुरा :– वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा सास्ती येथील भूमी अधिग्रहण झालेल्या लाभार्थी शेतकर्यांना वेकोली बल्लारपूर क्षेत्रा कडून लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. या प्रसंगी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी सांगितले की सध्या वेकोली कडून प्रकल्पग्रस्तांना दिली जाणारी आर्थिक मदत ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ठरवून दिल्या प्रमाणे दिली जात आहे. विरोधकांनी उगाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. यापुढे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रती एकरी २० ते २५ लाख रुपयांची तरतूद यावी यासाठी आपण संसदेत चर्चा करू. त्यांनी वेकोली प्रशासनाला निर्देश दिले की शेतकर्यांना जमिन अधिग्रहणाचे धनादेश देण्यात आले तसे आता लगेच त्यांना नोकरीवर रुजू करण्यात यावे, सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोईचे होईल यासाठी कँप चे आयोजन करण्यात यावे. तर आमदार सुभाष धोटे यांनी वेकोली प्रभावाने क्षेत्रात निर्माण झालेल्या स्थानिक प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्यासाठी वेकोलीने पुढाकार घ्यावा असे सांगीतले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक डे, नियोजन अधिकारी जी.पूल्लया, कामगार नेते शंकर दास, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, धोपटाळा चे सरपंच राजू पिंपळशेंडे यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.