By : Mohan Bharti
गडचांदूर: सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक १२ ऑक्टोबरला २०२१ ला “आरोग्य भारती चंद्रपूर या सामाजिक संघटनेच्या व सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शरदराव पवार महाविद्यालयाच्या सभागृहात धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधवबाग मल्टीडीसीप्लीनरी कार्डिअक केअर क्लिनिक चे संचालक व आयुर्वेद डॉक्टरांची संघटना निमा, चंद्रपूर चे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून निरोगी आणि सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.आहार, विहार आणि निद्रा ही त्रिसूत्री जर अंगीकारली तर जीवन निरोगी राहील याविषयी विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्माईल फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजना नागतोडे व आरोग्य भारतीच्या सदस्या किरण ताई बुटले ,गडचांदूर येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सोनटक्के, शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे, पर्यवेक्षक संजय गाडगे, कार्यक्रमाची आयोजिका भुवनेश्वरी गोपंवार मॅडम उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी आयुर्वेद ,मानवी जीवन शैली,आरोग्य , धन्वंतरी याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या व आरोग्याच्या दृष्टीने महत्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन महेंद्रकुमार ताकसांडे, प्रस्ताविक किरण ताई बुटले तर आभार प्रदर्शन ज्योती चटप यांनी केले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.