लातूर : (सोमवार दि. ११ आँक्टोबर २१)
उत्तर प्रदेशमधील लखिंमपुर खेरी येथे न्याय्य मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून गाड्यांचा ताफा घालून त्यांची निघृनपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध नोंदवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. या बंद मध्ये लातूर जिल्हा उत्स्फुर्तपणे सहभागी झाला. जिल्हयात तालुकानिहाय रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व घटक पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी केले होते.लातूर जिल्हयात महाविकास आघाडीच्या वतीने तालुका निहाय आंदोलन करण्यात आले. लातूर येथे गरूड चौक, पिव्हीआर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, यशोदा थिएटर, गंजगोलाई, गुळमार्केट, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, महात्मा गांधी चौक अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यानंतर लातूर तहसिलदार स्व्प्नील पवार यांना तहसिल कार्यालय येथे जाऊन निवेदन देण्यात आले. आपली दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी बंदला ऊस्फुर्त पाठींबा दिला. या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारने लादलेले शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करावेत, उत्तर प्रदेशातील लखिंमपुर खेरी येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या रॅलीत गाड्यांचा ताफा घुसून शेतकऱ्यांना चिरडण्यात आले, शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तींना त्वरित अटक करावी, आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अवैधरित्या थांबवून ठेवले, शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकणाऱ्या या प्रवृत्तींचा निषेध नोंदवण्यात आला.आज ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदमध्ये लातूर, उस्मानाबाद, औरंगाबादसह मराठवाड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व घटक पक्ष, संघटना सहभागी झाले. लातूर येथे या बंदमध्ये लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, शेकापचे भाई उदय गवारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष शिवाजी माने, आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप माने, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. किरण जाधव, काँग्रेस पक्षाचे गटनेते ॲड. दिपक सुळ, लक्ष्मण कांबळे, नामदेव चाळक, विष्णुपंत साठे, ॲड. बाबासाहेब गायकवाड, कामगार आघाडीचे राजकुमार होळीकर, रमेश सुर्यवंशी, प्रविण पाटील, प्रविण सुर्यवंशी, सुलेखा कारेपूरकर, कल्पना मोरे, सुरेखा गिरी, हकीम शेख, सुरेश चव्हाण, सुंदर पाटील कव्हेकर, ॲड. देविदास बोरूळे पाटील, ॲड.राजेश खटके, ॲड. विजयकुमार जाधव, सुधाकर शिंदे, इम्रान सय्य्द, ॲड. प्रदिपसिंह गंगणे, महेश काळे, ॲड.फारूक शेख, आयुब मणियार, युनुस मोमीन, दत्ता सोमवंशी, प्रविण कांबळे, राजेसाहेब सवई, संजय जगताप, सचिन दाताळ, रणधिर सुरवसे, दत्ता सोमवंशी, अंतेश्वर कुदरपाके, राहूल मातोळकर, गजानन खामितकर, ॲड. प्रदिप पाके, पांडुरंग वीर पाटील, सचिन गंगावणे, धंनजय शेळके, अक्षय मुरूळे, प्रभात पाटील, मनिषा कोकणे, शिंगडे, अभिषेक पंतगे, अकबर माडजे, शेख अब्दुल्ला ,प्रा.एम.पी.देशमुख, कैलास कांबळे, विकास कांबळे, सचिन मस्के, अंगद गायकवाड, श्रवण मस्के, पवनकुमार गायकवाड, फारुख शेख, विजयकुमार साबदे, पुनीत पाटील, अमित जाधव, अस्लम शेख, हाजी मुस्तफा, दगडूसाहेब पडिले, दगडुअप्पा मिटकरी, राम गोरड, जमालोद्दीन मणियार, अबू मणियार, अजीज बागवान ,करीम तांबोळी, अराफत पटेल, जफर पटवेकर, कुणाल वांगज, युनूस शेख ,खाजा शेख, यशपाल कांबळे, राहुल डूमने, गोविंद केंद्रे, सुरेश चव्हाण, सोनू डगवले, सिकंदर पटेल, मुब्बाशिर टाके, पवन सोलंकर, बालाजी झिपरे, अभिजित इगे,तबरेज तांबोळी, रघुनाथ शिंदे, रघुनाथ मदने, राजकुमार माने, हमीद बागवान, मनोज देशमुख, बप्पा मार्डीकर, डॉ.बालाजी सोळुंके, सुनीत खंडागळे, अविनाश बट्टेवार, कलीम शेख,रमाकांत गडदे, मूनवर सय्यद, इम्रान गोंदरीकर, प्रमोद जोशी, संजय सूर्यवंशी, संजय जगताप,विष्णू धायगुडे, गौस गोलंदाज, शादुूल शेख, आदी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष व इतर मित्र पक्ष तसेच कामगार आणि शेतकरी संघटनांच्या महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या हा बंद लातूर जिल्हयात यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले.