लोकदर्शन 👉 मोहन भारती
🔸(आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा संक्षिप्त आढावा उलगडणारा विशेष लेख)
क्षेत्रातील जनसामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन विकासासाठी संघर्ष करणारे लोकनेते आमदार सुभाष धोटे हे राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, कृषी, आरोग्य, साहित्य, संस्कृती, क्रीडा, उद्योग, व्यापार, पर्यटन अशा एक ना अनेक क्षेत्रात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आहे. क्षेत्रात रस्ते, पुल, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योग, व्यापार, कृषी विकास, सिंचन, निवास, पर्यटन यासह सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आणि त्यात सातत्य ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. विविध क्षेत्रात त्यांचे चाहते, स्नेही आहेत. ते उत्तम वाचक आणि स्पष्ट वक्ते आहेत. सुशिक्षित, अनुभवी, कणखर आणि कसलेले नेतृत्व आहेत. राजकारण, समाजकारण याव्यतिरिक्त शिक्षण, सहकार क्षेत्रावर त्यांचे विशेष प्रेम आहे. आजही इतक्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ते शैक्षणिक व सहकारी संस्थांना भेटी देऊन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, बँकेचे कर्मचारी, अधिकारी व गुंतवणूकदार यांचेशी आस्थेने विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन करीत असतात.
आमदार सुभाष धोटे यांचा जन्म १० आॅक्टोबर रोजी राजुरा येथे झाला. जरी वारसाहक्काने राजघराण्यात त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचा राजकारणाचा पिंड सर्वसामान्याच्या सहवासात तयार झालेला आहे. त्यांचे वडील रामचंद्रराव धोटे राजुराचे प्रथम नगराध्यक्ष व आमदार होते. काका विठ्ठलराव धोटे हे सुद्धा आमदार राहीले आहेत. सुभाष धोटे वयाने अगदी ११ वर्ष्याचे असताना वडिलाचे छत्र हरपले कुटुंब आणि राजकीय वारशाची जबाबदारी त्यांचेवर येऊन पडली असताना न डगमगता अतिशय खंबीरपणे आई मालतीबाई धोटे यांच्या मातृछायेत कुटुंबाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. एक सामान्य निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून विध्यार्थी दशेपासून कॉंग्रेस विचारसरणीशी ते कायमचे जुळले. या क्षेत्राचा व स्थानिक प्रश्नांचा त्यांनी जवळून अभ्यास केला. वडिलांचा दुरदृष्टीकोन, माजी मंत्री दादासाहेब देवतळे, काका विठ्ठलराव धोटे, लोकनेते प्रभाकरराव मामुलकर यांचे मार्गदर्शन, स्वतःचे अनुभव यांचा पूरेपूर उपयोग करून त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचे ठसे उमटवले, आदिवासी बहुल, डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजाशी त्यांची नाळ कायम जुळलेली असून जनसामान्यात मिसळून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम ते सतत करीत आहेत. त्यामुळेच सन २००९ आणि २०१९ मध्ये जनतेनी त्यांच्या कार्याची व नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना दोनदा आमदारकी बहाल केली आहे. सामान्य जनतेचा विश्वास पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने संघर्ष करीत आहेत.
आपल्या २००९ ते २०१४ या कार्यकाळात त्यांनी क्षेत्रात विकास कामांसाठी कोतावधी रुपयाचा निधी खेचून आणला तर वर्तमान काळात त्यांनी क्षेत्राच्या विकासासाठी कोरोना संकट काळातही मोठ्या तडमडीने राजुरा विधानसभा क्षेत्रात एकूण १०० कोटी ५९ लक्ष रुपये निधी मंजूर करून क्षेत्रात विकासकामांना गती दिली आहे. यात २०२० – २०२१ च्या अर्थसंकल्पात ५४ कोटी ३९ लक्ष, ग्रामविकास निधी अंतर्गत ७ कोटी २१ लक्ष, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत २२ कोटी ३२ लक्ष, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ६ कोटी ८५ लक्ष, आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ७ कोटी ६ लक्ष, वसंतराव नाईक तांडा वस्ती अंतर्गत १ कोटी ४९ लक्ष, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत १ कोटी २७ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. तर एल डब्ल्यू ई अंतर्गत राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथे १८४ कोटी रुपयांची विकासकामे प्रगती पथावर आहेत.
क्षेत्रात पर्यटन विकास हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळेच अमलनाला मध्यम प्रकल्प पर्यटन विकासाकरिता ७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला, वैशिष्टय़पूर्ण योजने अंतर्गत राजुरा, गडचांदुर नगर परिषद, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, नगर पंचायतला १७ कोटी, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी क्रीडा संकुल निर्मीतीकरीता २३ कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राजुरा, कोरपना, गोंडपिपरी येथे २५ कोटी, गोंडपिपरी तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत बांधकामाकरीता १५ कोटी, राजुरा, गडचांदुर, कोरपना, गोंडपिपरी येथे ऑक्सीजन प्लांट निर्मितीकरीता ३ कोटी, गडचांदूर नगरपरिषद, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायत येथे अग्निशामक वाहनाकरिता ३. ४८ कोटी, नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत २ कोटी, खनिज विकास निधी अंतर्गत गडचांदूर ऐतिहासीक बुध्दभुमी जवळील परीसरात वाचनालय व इतर बांधकामासाठी १.५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
राजुरा पंचायत समिती च्या नविन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी २६ कोटी, गोंडपिपरी पंचायत समिती इमारत बांधकामासाठी २० कोटी, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा ५ कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत.
काम करताना प्रशासनावरील वचक, काम करण्याची तळमळ, हाती घेतलेले काम तळीस नेण्याची वृत्ती, स्पष्ट भूमिका त्यांच्या अंगी असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या सोबतीला सदैव सावलीसारखी उभी आहे आणि राजुरा विधानसभा क्षेत्र काँग्रेसचा अभेद्य असा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण केली आहे. क्षेत्रातील गोरगरीब जनतेची अविरत सेवा करण्यासाठी त्यांना सुदृढ दिर्घ आयुष्य लाभो या शुभकामनेसह त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा….. 💐💐
प्रा. प्रफुल्ल शेंडे.
रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा. 9823402273.