गडचांदूर : अल्ट्राटेक सिमेंट द्वारा अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन हे नेहमी आपल्या कार्यातून गरजूंना मदतीचा हात पुढे करत आली आहे.
शिक्षण हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून, प्रत्येक व्यक्ती हा साक्षर झाला पाहिजेत व प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहीजेत हे लक्षात घेता कोरोना नंतर शाळा सुरू होताच.
अल्ट्राटेकचे युनिट हेड श्रीराम पी.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपासच्या १२ गावातील, १३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५४० विद्यार्थाना, २७५२ नोटबुक वितरण करण्यात आले त्यामध्ये सिंगल लाईन, टु लाईन, फोर लाईन, स्क्वेयर व ड्रॉईंग बुक्स यांचा समावेश आहेत.
अल्ट्राटेकचे व्यवस्थापक संजय शर्मा व कर्नल दीपक डे यांनी प्रामुख्याणे याकडे लक्ष दिले. व सांगीतले की, विद्यार्थांचा शिक्षणासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू.
नोटबुक वितरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सी.एस.आर.टिम सतीश मिश्रा, सचिन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.