लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्या समन्वयातून विकास शक्य. — आमदार सुभाष धोटे.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– मध्य चांदा वनविभाग राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मानव व वन्यप्राणी संघर्ष या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोन्ही घटक पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. मानवी जीवन अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी, परिसरात विकास साधण्यासाठी गरजेनुसार धोरणात्मक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांच्या समन्वयातुन परिसराचा विकास शक्य आहे.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय वनाधिकारी अरविंद मुंडे, उपविभागीय अधिकारी अमोल गर्कल, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती कापनगाव चे अध्यक्ष रामचंद्र शिवणकर, वनपरीक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, बादल बेले, साळवे सर, वनविभागाचे कर्मचारी, राजुरा शहरातील आदर्श हायस्कूल, महात्मा ज्योतिबा फुले, श्री शिवाजी हायस्कूल, शिवाजी महाविद्यालय, शिवाजी हायस्कूल चुनाळा, इनफॅन्ट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, गोपिकाबाई सांगळा आश्रमशाळा शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन राउंड ऑफिसर देशकर यांनी केले. प्रास्तावीक वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी केले. या प्रसंगी वकृत्व स्पर्धेत एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात प्रथम क्रमांक कोमल मधुकर चनमेनवार, द्वितीय क्रमांक समीक्षा संतोष जीवतोडे, तृतीय क्रमांक माही रवी चल्लावार यांनी पटकाविला. क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण स्वतंत्र कुमार शुक्ला आणि मेघा धोटे यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *