लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर
चंद्रपूर जिल्हा महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चित्रा ताई डांगे यांच्या अध्यक्षतेखाली,महिलांची आढावा बैठक गडचांदूर येथे नुकतीच संपन्न झाली, महिलावर होणारे अत्याचार, महिला संघटन वाढविणे यावर उचित मार्गदर्शन करण्यात आले .
या आढावा बैठकीत जिल्हा अध्यक्ष काॅंग्रेस कमीटी चंद्रपूर चित्राताई डांगे, गडचांदुर नगरअध्यक्ष सौ. सविता ताई टेकाम, गडचांदुर शहरअध्यक्ष सौ. अर्चना ताई आंबेकर, गडचांदुर नगरसेविका सौ. अर्चना ताई वांढरे,सौ.ज्योती जेनेकर, सौ. सुनिता तुमराम,शबिया बेग , सौ. रेखाताई कोडापे , सौ. शांताताई आत्राम, सौ. छाया ताई तलांडे,अश्विनी ताई टेकाम सह महिला उपस्थित होत्या.
या आढावा बैठकीचे आयोजन गडचांदुर शहराच्या महिला काॅंग्रेसच्या शहरअध्यक्ष सौ. अर्चना ताई आंबेकर यांनी केले. महिलाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे त्यांनी आढावा बैठकित सांगितले.