राजुरा-शिक्षण क्षेत्रातील गुणवंत आणि किर्तीवंत विधार्थांचा गौरव व्हावा त्याचबरोबर त्यांच्या यशात सहभागी होऊन समाजाशी काही देणं लागत या सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या चुनाला येथील विद्या शिक्षण प्रसारक मंडळाने शिक्षण क्षेत्रातील विविध गुणवंतांचा सत्कार करण्याची गौरव शाली परंपरा सुरू केली असून आज रातुम नागपूर विद्यापीठातून रजतसह 6 पारितोषिक पटकाविलेल्या कु.ज्ञानदा धोटे यांचा भावपूर्ण सत्कार केला यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शनजी निमकर,विमाशी जिल्हाधक्ष केशवराव ठाकरे,मंडळाचे सचिव मुख्याध्यापक मनोज पावडे,प्रा.रमेश धवस, मंडळाचे उपाध्यक्ष बाबाराव वाबिटकर,मुख्याध्यापक नितिन कडवे,मुख्याध्यापक मोरेश्वर थिपे,मुख्याध्यापक बजरंग जेणेकर, पत्रकार श्रीकृष्ण गोरे,श्रीमती मेघा धोटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर म्हणाले कु.ज्ञानदा चे यश प्रेरणादायी असून तिच्या नावातच ज्ञान दान करण्याची वारसा असून तिने आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा असा आशावाद व्यक्त केला. ज्ञानदा हिने नागपूर येथील एल.ए. डी. महाविध्यालायातून बीए ची पदवी गुणवतेसह प्राप्त केली असून तिला भूगोल विषयासाठी शांती रंगराव मेमोरियल तर्फे रजत पदक आणि अनुराधा तांबे स्मृती चषक तसेच अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल डॉ.स.अयंगार स्मृती पारितोषिक, लिलाबाई केशव खाकरे स्मृती पारितोषिक व हरिभाऊ पाणीतकर स्मृती पारितोषिक, त्याचप्रमाणे श्रीरंग नारायण स्मृती पारितोषिक अशी सहा पारितोषिके प्रदान करण्यात आलेली आहे. सध्या नदा ज्ञानदा दिल्ली विद्यापीठांमध्ये इस अशियन स्टडीज या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून तिचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. ज्ञानदा ही स्वर्गीय ऍड.राम धोटे व शिक्षिका मेघा धोटे यांची जेष्ठ कन्या आहे राजुरा वासीयांसाठी ही बाब अतिशय गौरवशाली असून तिचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.
Related Posts
पंचायतराज संस्थेतून महिलांना मिळाली स्वतःची ओळख. — आमदार सुभाष धोटे.
लोकदर्शन 👉 मोहन भारती बालविकास प्रकल्प कार्यालयाद्वारा पंचायतराज संस्थेतील महिला प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाचे आयोजन. राजुरा (ता.प्र) :– बाल विकास प्रकल्प कार्यालय राजुरा द्वारा आयोजित पंचायत राज संस्थेतील महिला प्रतिनिधी चे तालुकास्तरीय प्रशिक्षण व मेळावा कार्यक्रमाचे आयोजन…
कार्यकर्त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्विकारून कार्य करावे. — आमदार सुभाष धोटे.
लोकदर्शन 👉 मोहन भारती नंदप्पा येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश. जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा नंदप्पा येथे जिवती तालुका काँग्रेस कमिटी द्वारा कार्यकर्ता बैठक व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध…
सिंधी येथील शेतकरी सोमा दामेलवार ने आत्महत्या करून संपविले जीवन.
लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील शेतकरी सोमा मल्ला दामेलवार वय वर्ष ६१ याने स्वतः च्या सर्वे नंबर २६६ मध्ये दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी सततच्या नापिकी ला कंटाळून नैराश्यातून…