लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
कोरपना तालुक्यातील जवळच असलेल्या कन्हाळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राऊत मुख्याध्यापक होते तर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री संभाजी कोवे पंचायत समिती माझी उपसभापती,श्री विनोद नवले माजी सरपंच, श्री चौधरी सर, श्री शुक्ला सर,श्री जिवतोडे सर, श्री दिवाकरजी मालेकर, श्री रामदासजी कौवरासे,श्री तेलंग सर,श्री गजभिये सर,सौ मडावी मडम,सौ भगत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी जिल्हा परिषद शाळेला दीनदयाल उपाध्याय यांचा फोटो भेट दिला तसेच श्री संभाजी कोवे यांनीसुद्धा शाळेला दोन फोटो भेट दिले तालुकाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकत थोर पुरुषांना अभिवादन केले व त्यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केले तसेच शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिक्षकांची शाळेबद्दल असलेली आसता पाहाता सर्व शिक्षक वर्गाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संभाजी कोवे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले इतर मान्यवरांनी आपापले विचार मांडले व आदरांजली वाहिली कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य श्री मनोहर जी सौ ताराबाई मेश्राम,सौ संध्याताई गेडाम आदींनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवतोडे सर यांनी केले संचालन गजभिये सर यांनी केले तर आभार तेलंग सर यांनी मानले