वन विभाग जिवती व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन वतीने वन्यजीव जनजागृती कार्यक्रम संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर,,
वन विभाग व वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंउडेशन गडचांदूर च्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्त , जिवती वनपरीक्षेत्र जिवती उपक्षेत्र अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती मारोतीगुढा येथे पर्यावरण व वन्यजीव जनजागृती , कार्यक्रम घेण्यात आला.सुरवातीला माणिकगड किला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,,नंतर गावा मध्ये रॅली काढण्यात आली ,वन्यप्राणी व वनांचे महत्व गावकरण्याना पटवून देण्यात आले , वन संवर्धन, दुर्मिळ झाडे याबाबत वनाधिकारी बालाजी बिंगेवार यांनी मार्गदर्शन केले, वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फौंडेशन गडचांदूरचे वन्यजीवअभ्यासक प्रितेष मत्ते , सुयोग भोयर , राकेश गोरे,पुरुषोत्तम निब्रड यांनी , वन्यजीवाचे महत्व , वन्यजीव जणजागृती , व साप, वन्यजीव, पक्षी संवर्धन , पर्यावरण संरक्षण या बाबत महत्वाचे मार्गदर्शक केले, तर जैविविधता या विषयावर अंबुजा फौंडेशनचे विधाते,जाधव यांनी गावकारण्यांना माहिती दिली. वन्यजीव सप्ताह उपवनसंरक्षक अरविंद मुंढे , सहायक वनसंरक्षक पवार , वन परिक्षेत्र अधिकारी मडावी ,यांच्या मार्गदर्शनाखाली करकाडे, बींगेवार , मडावी संयुक्त वनवेवस्थापन समिती मारोतीगूढा यांच्या नेतृत्वात पार पडला .
यावेळी , वनाधिकारी , एन बी पाटील, आलाम,कुरडबुझे ,
व वि कॅन फौंडेशनचे , प्रितेष मत्ते,सुयोग भोयर,दीपक पाटील,राकेश गोरे,दीपक खेकारे,पुरूषोत्तम निब्रड व गावातील नागरिक उपस्थित होते. मागील अनेक वर्षा पासून ग्रामीण भागात , जनजागृती चे कार्य वि कॅन फौंडेशनच्या वतीने सुरू असून वन्यजीव संवर्धना मध्ये महत्वाची भूमिका ठरत आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *