By : Mahadev Giri
वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर, बि.व्हि.बुधवंत,एम. एस. गिरी, एस. ए.महाडिक, डि.आर. नाईकनवरे, आर. बि.राडोड आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बि.व्हि.बुधवंत यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जिवन चारीत्रावर प्रकाश टाकला.मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस. डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. यावेळी सहशिक्षक जि.एम. कावळे,सौ.एस. आर. सोनवणे, व्हि.एन. बोंडे, भागवत मोरे, सौ, जि.आर.मळीबळीराम शेंबडे, के.एस. राऊत, नारायण आष्टकर,
आदिं उपस्थित होते.