By : Mohan Bharti
गडचांदूर – महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ,स्मिता ताई चिताडे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय पाटील गोरे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, पर्यवेक्षक अनिल काकडे होते. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, प्राचार्या स्मिता चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला,दोन्ही महान पुरुषांचे विचार आत्मसात करणे आजच्या शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले, याप्रसंगी एच, बी,मस्की यांनी सुध्दा विचार मांडले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले ,संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार तुकाराम धुर्वे यांनी मानले., याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,