लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर:-
आज परतीच्या पाऊसात तालुक्यात विजेच्या कडकडात सह पाऊस पडला यात बेलगाव शेतशिवरात चिंचोली येथील एका शेतकऱ्याचे तीन बैल वीज पडून ठार झाले तर एक बैल बचावला यात शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
बेलगाव शेतशिवरात बबन जंगा जुमनाके यांचे शेती आहे.तो सकाळी शेतात शेतीकामाकरीता बैल घेवुन शेतात गेला होता शेतात चार बैल चरत असताना अचानक दुपारी चार वाजता च्या दरम्यान विज कडाडली बैल चरत असलेल्या ठिकाणी पडली यात तीन ही बैल वीज पडल्याने ठार झाले. चौथा बैल थोड्या अंतरावरच चरत असल्याने सुदैवाने तो बचावला. याची माहिती पोलीस पाटील उषा गेडाम यांनी भ्रमणध्वनी वरुन पोलीस स्टेशन कोरपना, पटवारी,तहसील कार्यालयाला व शवविच्छेदन करीता वेटरनरी डॉक्टर यांना माहीती दिली परंतु वृत्त लिहे पर्यन्त कुणीही घटनास्थळी भेट दिली नाही. नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करुन योग्य मोबदला द्यावा अशी मागणी जनतेनी केली आहे. सध्या पावसाच्या उघड झापे मुळे परतीच्या पावसाने अधिकच कहर माजवला असुन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात ही घटना घडल्याने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.