लोकदर्शन👉 मोहन भारती
,,🔸जखमी गरोदर महिला ला झाले कन्यारत्न
गडचांदूर,,,
गडचांदुर येथून चंद्रपूर ला जात असलेल्या अंबुलन्स क्र, MH34 CL 1157 ला राजुरा कडून येणाऱ्या मालवाहू ट्रक क्र, MH 34 AV 941 ने जोरदार धडक दिली, यात 3 जण ठार झाले तर अंबुलन्स मधील 3 जण जखमी झाले, मृतक मध्ये ट्रक ड्रायव्हर चा समावेश आहेत,
गुरुवारी रात्री 9 च्या दरम्यान हरदोना (खुर्द)जवळ झालेल्या या भीषण अपघात ची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सत्यजित आमले पोलिसांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले, व तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले,
मृतकांची नावे अंबुलन्स मधील लक्ष्मीकांत सुभाष तेलतुंबडे (23)कल्याणी सुभाष तेलतुंबडे(47) रा,बैलमपूर,रणजित भीमसेन कोंडावले(47)रा,किसांननगर ता, सावली ,असून जखमी झालेल्या मध्ये अंबुलन्स चा ड्रायव्हर विनोद येलमुले ,गरोदर महिला सपना मोटघरे(23)व अन्य एकाचा समावेश आहे,या भीषण अपघात मध्ये सुदैवाने बचावलेल्या महिलेने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे,
पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी,धर्मराज मुंढे,तिवारी,बोरीकर व गावकऱ्यांनी अपघातस्थळी बचाव कार्यात मोलाचे सहकार्य केले,
,,,,,
राजुरा,, आदीलाबाद या राष्ट्रीय महामार्ग वरील हरदोना गावाजवळ सिमेंट चे ट्रक रस्ता च्या दोन्ही बाजूंना उभे असल्याने रहदारी विस्कळीत होऊन नेहमीच अपघात होतात, पोलिस विभागाने या ठिकाणी वाहतूक शिपाई नियुक्त करून कारवाई करावी अशी मागणी आहे,,