लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर
मंगळवार 28 सप्टेंबर रोजी वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संयुक्तरित्या उसगाव ते नकोडा जिओसी कोळसा खाण मार्गे बेलोरा पूल पर्यंत रस्त्याची पाहणी केली व सोबत सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस शहरातून होणारी कोळश्याची व सिमेंटची जडवाहतूक ही शहराच्या बाहेरून व्हावी यासाठी सोमवार 27 सप्टेंबर रोजी मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वेकोलीचे संजय वैरागडे, घुग्घुसचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांची बैठक झाली सध्या घुग्घुस शहरातून जडवाहतूक सुरु आहे ही शहराच्या बाहेरून सुरु करावी यासाठी चर्चा झाली आहे वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आपली भूमिका वेकोली अधिकारी मांडणार आहे शहर वासियांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे रस्त्यावरील प्रदूषण व अपघात होऊ नये यासाठी कायम तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली यावर मार्ग काढता येईल. हा रस्ता जडवाहनांच्या वाहतुकी करिता सुरु करण्यासाठी वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात काही दिवसाचा वेळ मागितला आहे.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलीचे संजय वैरागडे, ओमप्रकाश फुलारे, भाजपाचे शाम आगदारी, गुप्ता वाशरीजचे संजय सारंगे उपस्थित होते.