By : Mahesh Giri
नागपूर: यदुवंशी भरवाड संविधानिक हक्क परिषद, आणि शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या संघटना सोबत आज भरवाड समाजाचे रामाजी जोगराना यांच्या नेतृत्वात आमचा शाळेत प्रवेश घ्या या मागणीसाठी आज 5 बेड्यावरचे मुलं आपला शिक्षण हक्क मागण्यासाठी जिल्हापरिषद नागपूर कार्यालय सामोर पोहचले , हे आंदोलन किंवा मोर्चा नव्हता ही एक शिक्षण संचालक , विभागीय आयुक्त यांना विध्यार्थी स्वतः भेट देऊन आमचा प्रवेश का नाकारला जातो हा प्रश्न विचारण्यासाठी आले हॊते.
मागील महिन्याच्या २६ तारखेला सर्व शिक्षण विभाग मा. राज्य शिक्षा मंत्री बच्चु कडू साहेब, मा.ना. खासदार डॉ विकासजी महात्मे साहेब आणि भरवाड समाज संघटना , संघर्ष वाहिनी चे कार्यकर्ते यांनी भेट घेतली तेव्हा मा.मंत्री मोहदय ने स्पष्ट आणि सोप्या भाषेत या सर्व मुलांचे प्रवेश ७दिवसात घ्या व यावर नियंत्रण राहावे यासाठी समन्वयक म्हणून नियुक्त करा यासाठी प्रसन्नजित गायकवाड सिल्ली जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक व बालरक्षक यांची नियुक्ती करण्याचे आदेश मा.मंत्री मोहदय यांनी दिले मात्र १ महिना लोटून गेला तरी या विध्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही , एवढेच नव्हे तर समन्वयक यांना ही रीतसर पत्र देऊन त्यांना बसण्याची जागाही दिली नाही व कार्यासाठी पूर्णतः मोकळीक दिली नाही. १ आठवडा ऐवजी एक महिना वाट पाहत पुन्हा भेटी साठी पालक, संघटना, विध्यार्थी जिल्हापरिषद, व विभागीय आयुक्त यांना भेटले.
२७ सप्टेंबर ला रोटरी क्लब च्या माध्यमातून पालावरची शाळा खोलण्याचा घाट शिक्षण विभागाने घेतला होता ,त्याचे रीतसर उदघाटन शिक्षण संचालक च्या हस्ते होते, प्रश्न हा आहे मा.मंत्री यांनी सरकारी यंत्रने नुसार पावलावरची शाळा काढण्याचा प्रयोग करा असे मागील मिटींग मध्ये सुचविले होते. मात्र शिक्षण क संचालक चिंतामण वंजारी यांनी रोटरी क्लब व अन्य संस्था यांना भेटी घेऊन , बेड्याच्या भेटी करून ही पालावरची शाळा प्रायव्हेट तयार करणे सुरू केले, शासनाचे कार्य करीत असताना त्यांनी या अशासकीय निर्णय का घेतला हा प्रश्नच आहे जेव्हा की जिल्हापरिषद कडे अतिरिक्त शिक्षक भरपूर आहे, शाळा बंद होत चालल्या आहे , या अतिरिक्त शिक्षकांचे पगार ही सरकार देते मग मॉडेल म्हणून पालावरची शाळा या शिक्षकांना घेऊन का करता आली नाही. संचालक पगार महाराष्ट्र सरकारचा घेते आणि काम रोटरी क्लब चा करते असे प्रश्न संघर्ष वाहिनी चे मुकुंद अडेवार यांनी उपस्थित केला.
शिक्षण संचालक चिंतामण वंजारी म्हणाले की आम्ही २५० विध्यार्थी चे प्रवेश घेतले आहे असे यावेळेस सांगितले तेव्हा संस्था संघटक रामाजी जोगराना यांनी विचारले की आम्हाला अजून त्यांचे प्रवेश कोणत्या शाळेत दिले, त्यांना गणवेश, पुस्तक, खिचडी ची अन्न पुरवठा दिला नही त्या विध्यार्थी चे शिक्षक कोण हे ही अजून माहिती झाले नाही विध्यार्थीच्या पालकांची सही ही प्रवेशासाठी घेतली नाही , विध्यार्थी चे जन्मदाखला किंवा आधारकार्ड ही विचारले नाही मग हा कोणत्या प्रकारचा प्रवेश आहे,एका कागदावर लिहून नेल्याने रीतसर प्रवेश कसा मिळेल असा मोठा प्रश्न जोगराना यांनी यावेळेस विचारला.
या निवेदन भेटी साठी रामाजी जोगराना, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे , मुकुंद अडेवार ,धीरज भिसिकर, दीपक साने, सामाजिक कार्यकर्ते खुशाल ढाक, सचिन लोणकर, सकाळ माध्यमाचे प्रमोदजी काळबांडे, राधिका हेडवू,भरवाड समाज के रघु साठीया,छगनजी मेर,लखा भिगा साठीया,,नथु काला साठीया, मफा मेर,वेला खेमर,विरा भुरा, जयराम भरवाड,लाला भरवाड,देवराज अल्गोत्तर,भोपाळ बोलिया,वाघा राठोड, रघु साठीया उपस्थित होते.
यावेळेस पोलीस विभागाचे सदर थाना चे प्रभारी चौधरी साहेब, खेडेकर साहेब, कॉ. संजय यादव, वढले सह इतर पोलीस कर्मचारी यांनी ही भेट घालून देणे व मुलांची वेवस्थित काळजी घेतली व ह्या मिटींग घडवून आणून दिल्या. संघटनेने पोलीस विभागाचे विशेष आभार मानले , तसेच असंघटीत कामगारांसाठी काम करणाऱ्या राधिका हेडावू यांनी या मुलांना अल्पोहारची वेवस्था केली.यांचे ही विशेष आभार संघटनेच्या वतीने मानले. या निवेदन भेटी ला सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्टर, व कैमरामेन , तसेच प्रिंट मीडियाचे पत्रकार व फोटोग्राफर यांनी सर्व बाजूने प्रश्न उचलून धरले याबद्दल ही भरवाड संघटनेने सर्वाचे शतशः आभार व्यक्त केले.