जेष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ घ्यावा – उमेश राजुरकर

लोकदर्शन👉 मोहन भारती


🔸उपरवाही येथे कॉंग्रेसचे ‘गाव चलो अभियान’

🔸युवकांनी दीन-दुबळ्यांना सहकार्य करावे

कोरपना – जेष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ घ्यावा यासाठी युवकांनी दीन-दुबळ्यांना सहकार्य करावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष उमेश राजुरकर यांनी केले.
आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियान’ उपरवाही येथे संपन्न झाले. यावेळी गावातील ४० युवा व महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे घराघरात पोचविणे, नवीन कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, युवकांना राजकारणाचे महत्व समजावून सांगणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे.
यावेळी गाव चलो अभियानचे समन्वयक आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव रोशन आस्वले, एकनाथ गोखरे, घनश्याम तुराणकार, शुभम उरकुंडे, संतोष बल्की, किशोर बल्की, मनोहर निवलकर, विठोबा बोंडे, मुरलीधर बोंडे, भीमराव सिडाम, दिनकर मडावी व युवक, महिलांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन घनश्याम तुराणकार केले तर आभार एकनाथ गोखरे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *