By : Mohan Bharti
*गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशन ची मागणी
गडचांदूर : राजुरा-संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांना संशोधन प्रकियेत अडचणीचे ठरणारे गोंडवाना विद्यापीठाद्वारे निर्गमित दि.24 सप्टेंबर 2021 चे कोर्स वर्क आणि विद्या पीठाद्वारे मार्गदर्शक नेमणुकीचे परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी,प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांना निवेदन दिले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या संदर्भात कोर्सवर्क आणि मार्गदर्शक नेमणुकी बाबतचे परिपत्रक काढले आहे हे सदर परिपत्रक विद्यापीठाच्या रेगुलाशन ला छेद देणारे असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येताच गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ने सदर परिपत्रक रद्द करण्या संबंधी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कुलसचिव आणि प्र-कुलगुरू यांचे सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी चर्चा केली. यावेळीसदर प्रश्नांवर विध्यापिठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून सदर परिपत्रकावर पुनर्विचार करून विध्यापरिषदेची तातडीची सभा आजोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर परिपत्रकानुसार पेट परीक्षा दिल्यानंतर विविध संशोधक विद्यार्थ्यांनी कोर्स वर्क करणे हे अतिशय अडचणीचे ठरणारे असून यासंदर्भात विद्यापीठाने या आधी तशी कोणतीही सूचना दिलेली नव्हती.तसेच पूर्वीच्या पद्धतीत संशोधक विद्यार्थ्याने संशोधन केंद्रावर संशोधन आराखडा दाखल करणे व संशोधन केंद्रावरील संशोधन सल्लागार समितीच्या माध्यमातून मार्गदर्शकाची निवड करणे तसेच विध्यापिठ संशोधन समितीने मान्यता दिल्यानंतर कोर्स वर्क करणे ही पद्धत अस्तित्वात होती. मात्र नुकत्याच विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकामुळे संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शकांना कुठलेही निवडीचे स्वातंत्र्य नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करणे अडचणीचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर परिपत्रक रद्द करण्याच्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय गोरे, सचिव प्रा. डॉ. विवेक गोरलावार,उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने,डॉ.किशोर कुडे डॉ.अभय लाकडे इत्यादी मान्यवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर समस्या बाबतचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे.