लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर
🔸*खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्वाही*
चंद्रपूर : शहरातील नागरी सुविधा व रस्त्यांमुळे विकास कामांना गती मिळते. शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली. ते भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, शहरातील विकास कामे दर्जेदार होण्यासाठी लोकप्रतिनीधींसह नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. शासनामार्फत रस्ते विकासाबरोबरच इतरही प्रश्न मार्गी लावण्यात येतील. शहरवासीयांनी कोरोनाच्या संकटाला ज्या पद्धतीने परतावून लावले, त्याच पद्धतीने आगामी काळात नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांना समुपदेशन करून लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भद्रावती नगर परिषदेचे कर्त्यव्यदक्ष नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या प्रयत्नाने आज भद्रावती शहरातील प्रभाग क्रमांक १, ५, ७, ८, १०, ११, १२ आणि १३ मध्ये भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटकी , नगरसेवक सुधिरभाऊ सातपुते, विनोद वानखेडे, चंद्रकांत खारकर, निलेश पाटील, रेखाताई राजुरकर, रेखाताई खुटेमाटे, शोभाताई पारखी, लक्ष्मीताई पारखी, अनिता मुंडे, शितल गेडाम, प्रतीभा सोनटक्के, सुनिता टिकले, सरीता सुर, लिला ढुमने, प्रतिभा निमकर, जयश्री दातारकर, तालुकाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी भद्रावती प्रशांत काळे, अध्यक्ष भद्रावती शहर काँग्रेस कमिटी सुरज गावंडे, अध्यक्ष भद्रावती शहर युवक काँग्रेस योगेश घाडगे, उपाध्यक्ष भद्रावती शहर काँग्रेस, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, मंगेश मत्ते, अनिल मोडक, निखिल राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, भविष्यात भद्रावती शहरामध्ये चांगले कामे उभी राहतील. यासाठी आपण प्रयत्नशील असून, नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक भागाचा विकास करण्यात येत आहे. भद्रवती शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु असून, शहरातील अनेक भागात कामे सुरु आहेत. या कामांमधून शहरातील प्रलंबित कामांना चालना मिळणार आहे.