वालुर/प्रतिनिधी 👉 महादेव गिरी
जिंतूर येथील पत्रकार मोहम्मद एजाज यांच्यावर भूमाफियांनी जिवघेणा हल्ला केला.हल्ल्याचा सेलू तालुका अखील भारतीय मराठी पत्रकार संघांच्यावतिने उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांना दि.24 शुक्रवार रोजी निवेदन देउन निषेध नोंदविण्यात आला.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील पत्रकार महम्मद एजाज यांनी जमिन हडपल्या ची बातमी आपल्या वृतपत्रात छापली होती. त्याचा राग मनात धरून जमीन हडप केलेले भूमाफिया यांनी जिंतूर येथील तहसिल कार्यालयात मंगळवारी दि.21 पत्रकार महम्मद एजाज यांच्यावर जिवघेणा हल्ला करून जिवे मारण्याचा मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमूळे सर्व जिल्हाभरातील पत्रकारात संतापाची लाट पसरली असून बातमी छापल्याचा राग मनात धरून सदरिल हल्ला भूमाफीयांनी केला असल्याने या प्रकरणातील हल्लेखोरांवर योग्य कार्यवाही करून शासन करण्यात यावे. तसेच पत्रकार महम्मद एजाज यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी अखील भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतिने करण्यात आली आहे.या निवेदनावर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव निसार पठाण कार्याध्यक्ष संजय मुंढे,उपाध्यक्ष राधाकिशन कदम,कांचन कोरडे,दिलिप डा साळकर, शेख मोहसीन, श्रीपाद कूलकर्णी, महमद इलियास, दिलिप मोरे, राहुल खपले, रामेश्वर बहिरट, शिवाजी आकात, समशेरखा पठाण, महादेव गिरी, संतोष गरड, आदींच्या स्वाक्ष-या आहेत.