By : Shankar Tadas, Chandrapur
* २४,२५,२६ सप्टेंबर रोजी पुण्यात प्रदर्शन
वीणा गोखले Veena Gokhale संचालित ‘आर्टिस्ट्री’, पुणे मार्फत सामाजिक संस्थांच्या कामाची समाजाला ओळख व्हावी या हेतूने पुण्यात गेली १६ वर्षे दरवर्षी महाराष्ट्रातील निवडक ३० सामाजिक संस्थांचे प्रदर्शन भरवले जाते. ज्यामध्ये पुण्यातील हजारो लोक येऊन संस्थांची माहिती घेतात आणि संस्थांना यथाशक्ती आर्थिक स्वरूपात मदत करतात, संस्थांना आवश्यक वस्तू, कौशल्य व वेळ ही देतात.
या अनोख्या व नावाजलेल्या उपक्रमात यावर्षी महाराष्ट्रातील १५ संस्थांमध्ये आपल्या इको-प्रो संस्थेची निवड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘इको-प्रो’ संस्था मागील 17 वर्ष पासून पर्यावरण, वन-वन्यजीव, सर्प संरक्षण व संवर्धन, ऐतिहासिक वारसा-वास्तु संवर्धन, आपातकालीन व्यवस्थापन, रक्तदान, आरोग्य सेवा व सामाजिक आदि क्षेत्रात भरीव कार्य करीत आहे. या कार्याकरिता संस्थेस भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय द्वारे 2017 ला ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ तर राज्य शासनाच्या क्रीड़ा व युवक विभाग तर्फे 2015 ‘राज्य युवा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आलेला आहे.
इको-प्रो संस्थेने पर्यावरण, वन-वन्यजीव संवर्धन संरक्षण कार्य करीत प्रस्तावित कोळसा खान विरोधात सत्याग्रह-संघर्ष उभारुन जनआन्दोलनातून हजारों एकर जंगल व वाघाचे अधिवास संरक्षण करण्यात यश मिळाले आहे. वन्यप्राणी अधिवास-जंगल संरक्षण करिता भरीव कार्य केल्याने संस्थेचा विविध स्तरावर वेळोवेळी गौरव केलेला आहे. शेकडो संकटग्रस्त वन्यप्राणि रेस्क्यू ऑपरेशन मधे प्रत्यक्ष सहभाग घेत वन्यप्राणीना जीवदान दिले आहे. सोबतच संस्थेचे सर्पमित्र सेवा देत मानवी वस्तीत निघालेले सर्प पकडून जीवदान देणे, नागरिकांची भीती व अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य करीत आहेत. प्रदूषण विरोधी सत्याग्रह, आंदोलन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव ‘ग्रीन गणेशा’ अभियान 2007 पासून, POP मूर्ति विरोधात जनजागृती, पुरपरिस्थिती दरम्यान रेस्क्यू, मदत कार्यात सहभाग. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तु संरक्षण करण्यास ‘आपला वारसा, आपणच जपुया” हा संदेश घेऊन चंद्रपूर शहरातील गोंड़कालीन ऐतिहासिक 11 किमी लांब किल्ला-परकोट स्वच्छता सलग 1000 दिवस करीत वारसा संवर्धनाचा महत्वाच्या संदेश दिला. या कार्याचा गौरव सुद्धा मा. पंतप्रधान यांनी “मन की बात” मधे केला आहे. संस्थेचे ब्रीद आहे “इको-प्रो ची हाक, चंद्रपुरकरांची साथ” असून, संस्थेच्या विविध स्तरावर सामाजिक उपक्रम सुरु असतात, संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रम, अभियान, सत्याग्रह मधे नागरिकांचा सुद्धा सहभाग असतो.
परंतु संस्थेच्या कामाचा वाढता व्याप बघता या कार्यात अनेकांची मदत आणि सहकार्य अपेक्षित असल्याने, या कामाला अधिक गती व विस्तार मिळण्यासाठी अनेकानेक कृतिशील व दानशूर हात सोबत येणं गरजेचं आहे, तेव्हाच संस्थेच्या माध्यमाने सुरु असलेली विधायक काम शाश्वतपणे उभं राहिल. आपण पुण्यात असाल तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या व सहकार्य करा. तसेच पुण्यातील आपल्या संपर्कात ही माहिती जास्तीत जास्त व्यक्तिना share करा, जेणेकरून चांगल्या कामात चांगले लोक जोडले जातील.
दिनांक : २४, २५, २६ सप्टेंबर २०२१
वेळ: सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत.
ठिकाण : हर्षल हॉल, कर्वे रोड, पुणे.
इको-प्रो विषयी अधिक माहितीसाठी :
चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान -१००० दिवस-‘मन की बात’
रामाळा तलाव संवर्धन सत्याग्रह
https://marathi.abplive.com/videos/chandrapur-bhuikot-killa-fort-cleanliness-by-eco-pro-special-story-10-05-2017-403759
किल्ला स्वच्छता ABP माझा news
https://www.facebook.com/ecopro.chandrapur
इको-प्रो चंद्रपूर फेसबुक
https://www.aninews.in/news/national/general-news/chandrapur-this-ngo-is-educating-people-about-importance-of-water-conservation20190702221428/
रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियान
संपर्क: 9370320746
E-mail: ecoprochd@gmail.com
Visit | Donate | Share |
Eco-Pro Chandrapur Eco-Pro Chandrapur
Kunal Deogirkar Sumit Kohale Jayesh Bainalwar Sachin Dhotre Bandu Dhotre Nitin Ramteke