By : Mohan Bharti
राजुरा-चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शिक्षण विकासासोबत संशोधन विस्तार कार्य व विकास होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली मात्र या उद्देशाची परिपूर्ति होत नसून या विद्यापीठांतर्गत संशोधन कार्य करीत असताना संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात संशोधनाच्या विविध संधी असून पर्यावरण, विज्ञान, खनिज साधने, वनऔषधी,पंचायत राज व ग्रामविकास, ऐतिहासिक वैभव या अनेक विषयांतर्गत संशोधकांना संशोधनात्मक नवनिर्मिती करण्यास वाव आहे. आचार्य पदवी करता निर्धारित पेट परीक्षेमध्ये विविध विषयांतर्गत अनेक विद्यार्थी पास झालेली असून प्रत्येकाला संशोधनाची संधी मिळणे क्रमप्राप्त आहे या सर्व पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने उपरोक्त समस्या सोडविण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्र- कुलगुरू मा.डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव मा.डॉ.अनिल चिताडे यांना निवेदन दिले आहे. उपरोक्त निवेदनामध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.पीएचडी कोर्स वर्क कालावधी कमी करणे तसेच या कोर्स वर्क साठी आकारण्यात आलेले अवास्तव शुल्क कमी करणे, आचार्य पदवी संशोधन प्रबंध सादरीकरण फी कमी करणे, आचार्य पदवी बहिस्थ पर्यवेक्षका करिता पीएचडी संशोधन प्रबंधाचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी गुणात्मक मूल्यांकन अहवालाचे स्वरूप तयार करणे, विद्यापीठांतर्गत मान्यता दिलेल्या विविध विषयाच्या संशोधन केंद्रावर विद्यार्थ्यांची व सहयोगी मार्गदर्शकांची संख्या वाढवणे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम नसलेल्या मात्र आचार्य पदवीचे मार्गदर्शक असलेल्या पदवी महाविद्यालयात नवीन संशोधन केंद्रे निर्माण करणे, या अशा अनेक संशोधन प्रकियेशी निगडीत मागणीसह महाविद्यालयीन शिक्षकांचा विद्यापीठीय कामकाजासाठी निर्धारित केलेला प्रवास भत्ता 15 रुपये प्रति किलोमीटर व स्थानिक भत्ता 200 रुपये करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व प्र कुलगुरू व कुलसचिव यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच सदर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उपरोक्त मान्यवरांनी दिले आहे यावेळी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशन चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय गोरे, सचिव प्रा.डॉ. विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ.प्रमोद बोनधाने आणि विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र मुद्दमवार प्रामुख्याने उपस्थित होते