घुसखोर कुठे सापडणार नाहीत ..ते सर्वत्र आहेत .केवळ भारताच्या सीमाभागात घुसखोरी होते असा भागच नाही .राजकारणात कलंकित , लुटारू व्यक्तींची , सामाजिक कार्यात असामाजिक तत्वांची , शिक्षणक्षेत्रात राजकारण्यांची अन आध्यत्मिक क्षेत्रात अव्वल बदमाशांची घुसखोरी आजची नाही तर फार पूर्वीपासून आहे ..या अवघ्यांच्या डोळा त्या क्षेत्रात होणाऱ्या कमाईवर असतो ..पत्रकारिता माध्यमे सुद्धा यातून सुटली नाही ..ट्रस्ट च्या नावाने नोंदविलेल्या धार्मिक संस्थांची सर्वांग चौकशी केली तर मोठे घबाड सापडेल ..आता सर्वच तसे नसले तरी बरेच तसे आहेत ,.भारतातील बहुसंख्य धार्मिक स्थळावर प्रचंड गोंधळ आहे ..मंदिर , गिरजाघरे , मशिदी सांभाळणारे ट्रस्ट म्हणजे भक्तांची सेवा करण्यापेक्षा त्यांच्याकडून मेवा किती मिळतो याचीच अधिक काळजी वाहणारी संस्थाने ..,याला अपवाद शेगावच्या गजानन महाराज संस्थान सारखे बोटावर मोजणारी संस्थाने सांगता येतील .देशांतर्गत मंदिरे , मठ ,आखाडे , आदींकडे अब्जावधीची चल ,अचल संपत्ती आहे .. साधू , संन्याशाच्या रुपात अवतरलेल्या काही संधीसाधू भांमट्यांचे लक्ष त्या संपतीवरच केंद्रित असते ..मग ती लुबाडण्या साठी डाव खेळले जातात ..असाच डाव आत्महत्या झालेल्या आखाडा परिषदेच्या महंत नरेंद्र गिरी यांच्या संदर्भात त्यांचा चेला आनंद गिरीने खेळला …आपल्या गुरुलाच ब्लॅक मेलिंग करणाऱ्या या चेल्याला पोलिसांनी गजाआड केले ..आनंद गिरी हा पंचतारांकित साधू ज्याने घडविला तो गुरू नरेंद्र गीरींच्या आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे ..त्याच्या विरोधात तशी तक्रारच दाखल झाली आहे ..आनंद गिरी उंचपुरा , गोरागोमटा अतिशय देखणा तरुण साधू केवळ 10 वर्षाचा असताना राजस्थानमधून उत्तराखंडात दाखल झाला.आखाड्यात परंपरानुसार शिस्यांना दीक्षित केल्या जाते ..त्यांना मग उपाधी दिल्या जाते ..आनंद गिरीचा परीचय काहीच वर्षात नरेंद्र गिरीचा शीष्य स्वरूपात झाला ..इंग्रजी भाषेसह हिंदीवर कमालीचे प्रभुत्व असणारा आनंदगिरी अल्पावधीत प्रयागराज मध्ये लोकप्रिय झाला ..,साधूच्या वेशात बुलेटवर स्टंट करणारा आनंदगिरी युवकांचा आयकॉन झाला.. नरेंद्र गिरी यांच्या शिष्यात आनंदगिरी अव्वल स्थानावर होता ..नरेंद्र गिरी कमी बोलत होते ..मग हनुमान मंदिरात दर्शनाला येणाऱ्या पंचतारांकित भक्तांसोबत इंग्रजीत तोंड वाजविण्यासाठी नरेंद्र गिरी हे आनंद गिरीला पुढे करीत ..यातून त्याचा दबदबा पोलीस अधिकारी ,राजकारण्यांच्या वर्तुळात वाढला..तो मग भस्मासुर होऊन गुरू नरेंद्र गिरीच्या मागे धावत सुटला ..त्याने वाघांबरी मठात प्रचंड घोळ असल्याची तक्रार केली ..मठाच्या जमिनी नरेंद्र गिरी कवडीमोल भावाने विकत असल्याचा आरोप आनंद गिरीने केला ..पण त्याची भट्टी जमली नाही ..निरंजन आखड्यांसमवेत अवघ्या साधू संतांनी नरेंद्र गिरी यांच्या समर्थानात उडी घेताच भेदरलेल्या आनंद गिरीने तक्रारी मागे घेत गुरू नरेंद्र गिरी यांची माफी मागितली ..पण दंश घेण्याचे काम त्याने सोडले नाही ..नरेंद्र गिरी यांनी त्याला माफ तर केले पण त्याची वाघांबर मठ व निरंजन आखड्यातून हकालपट्टी केली ..,दरम्यान आनंदगिरी याने योग गुरू अशी आपली प्रतिमा तयार केली ..आनंद हा योगगुरू स्वरूपात आस्ट्रेलियात गेला होता ..तेथे त्याने एक महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्यामुळे त्याला।गजाआड व्हावे लागले ..कसा बसा तेथून तो भारतात परतला ..त्यानंतर तो नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करू लागला ..आता खर खोटं तपासात बाहेर पडेल पण सरकारने धार्मिक स्थळावर तिरपी नजर ठेवणे गरजेचे आहे.
Related Posts
वालूरच्या प्राचीन मंदिरास व बारवास आयुक्तांची भेट
लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉 महादेव गिरी सेलू तालुक्यातील वालूर येथील पुरातनकालीन सिध्देश्वर मंदिर , श्री वाल्मीकेश्वर मंदिर व बारव यास औरंगाबाद विभागाचे विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवार दि.10 जून रोजी भेट देवून जीर्णोध्दारासंदर्भात ग्रामस्थांबरोबर हितगुज…
मी क्रोबा, एक दंशही पुरेसा; भाजपात दाखल होताच मिथून चक्रवर्तींचा इशारा
शिवाजी सेलोकर अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. “कुणी जर हक्क हिसकावून घेत असेल, त्याच्या हक्कासाठी उभा राहिन. मी कोब्रा आहे.…
महात्मा गांधीजींचा विचार केवळ वर्धा आणि गडचिरोली या दोनच जिल्हयांपुरता मर्यादीत आहे काय – भाजपाचा सवाल
By : Shivaji Selokar कोरोना काळात जनतेला काय द्यावे याचे भान सरकारला उरले नाही राज्य सरकार दारूविक्रेत्यांच्या पाठिशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी १९२० मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वांना उभे करून शपथ घ्यायला लावली होती की आम्ही…