By : Mohan Bharti
शेतक-यावर सक्ती न करता शासकिय यत्रनेकडून पिक पाहणी करण्याची वाढई यांची मागणी.
राजुरा :– चंद्रपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे बहुजन कल्यान, खार जमिनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण चंद्रपूर जिल्ह्य़ातील मध्ये ११ टक्के होते ते १९ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील ६ टक्के होते ते १७ टक्के करण्यासाठी विशेष प्रयत्न करून या दोन जिल्ह्य़ासह एकूण आठ जिल्हयात ओबीसी आरक्षण सुविधेत वाढ करुन लागु केल्याबद्दल काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच इ पिक पाहणीची शेतकऱ्यांवर सक्ती न करता शासकीय यंत्रणेकडून इ – पिक पाहणी करावी अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये सध्यास्थितीत शेतक-याने शेतात लावलेल्या पिकाची पिक पाहणी करण्याकरीता ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतक-याचे सर्वे. नं. एकुण क्षेत्र, पोटखराब क्षेत्र तसेच शेतातील पिके यांची माहिती ई-पिक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये शेतक-यांनी स्वतः भरून व फोटो काढून अपलोड करने बंधनकारक करण्यात आले आहे. वरील या सर्व बाबी करने आजच्या शेतक-यांची आर्थिक परीस्थिती बघता अडचणीचे ठरत आहे. अनेक शेतक-यांकडे अॅड्राइड मोबाईल उपलब्ध नाही आणि उपलब्ध करने शक्य नाही त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नाही त्यामुळे गरीब व अर्धशिक्षीत सामान्या शेतकरी बांधवासाठी ई-पिक पाहणी कार्यक्रम डोकेदुःखी ठरत आहे. तरी ई-पिक पाहणी कार्यक्रम रद्द करून शासकिय यंत्रणेद्वारे तो करावा अशी मागणी केली आहे. पालकमंत्री यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन या शिष्टमंडळास दिले आहे. या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत भाऊ धांडे, ओ बी सी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, उपाध्यक्ष राहुल ताजणे, ओबीसी अध्यक्ष गणेश दिवसे, सरपंच राजु पिंपळशेंडे, लहु चहारे, दिपक वांढरे, सुदर्शन मडावी यासह ओबीसी विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.