लोकदर्शन 👉 मोहन भारती
*🔸गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप*
गडचांदूर (ता,प्र,)
: कोरोना नियमांचे पालन करत गणेशोत्सव पार पडला. औद्योगिक नगरी गडचांदूर येथील गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने सामजिक आदर्श जपत गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. गणेश मंडळाने घेतलेला सामाजिक पुढाकार परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करताना माजी आमदार संजय धोटे यांची विशेष उपस्थिती होती. शिक्षणात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद असते. विद्यार्थी हा देशाचा कणा असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये हा विचार मंडळाच्या कृतीतून दिसून आल्याचे माजी आमदार संजय धोटे म्हणाले.
गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने १४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी हे गणेश मंडळ सामाजिक उपक्रमातून चर्चेत असते. कोविड काळात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करताना गडचांदूर येथील गरजू मुलांना पुस्तके देण्याचे उदात्त कार्य मंडळाने केले. यावेळी सतीश धोटे, नगरसेवक रामा मोरे, मनोज भोजेकर, नगरसेविका वैशाली गोरे, निलेश ताजणे, सतीश उपलेंचिवार, संदीप शेरकी, शिवाजी सेलोकर, दिलीप वांढरे आदींची उपस्थिती होती. संचालन मयूर एकरे तर आभार मनोज सातभाई यांनी मानले. मंडळाचे कुणाल पारखी, महेश झाडे, नितीन जगनाडे, अमित पारखी, सुनील बुटले, अभिलाष तुराणकर, अतुल झाडे, संकेत मेंढी, मंगेश कवलकर, विजय मोहूर्ले , प्रविण सतभाई आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.