लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर : अमलनाला धरण पूर्ण भरून वेस्ट वेअर सुरु झाला तेव्हा पासून पर्यटकांची संख्या वाढली आहे, विहंगमय दृश्य पाहण्यासाठी दुरदुरुन पर्यटक येत आहेत, रविवारी तर प्रचंड गर्दी असते, पाण्यात भिजून मनसोक्त आनंद लुटतात, मात्र अतिउत्साहीपणामुळे एका महिन्यात 3 युवकांना जलसमाधी मिळाली . 14 सप्टेंबर ला 2 युवकाचा बुडून मृत्यू होताच प्रशासन खडबडून जागे झाले. तात्काळ 15 सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सिंचाई विभागाचे अभियंता सय्यद अमीर,यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यटकांना दुर्घटना स्थळी जाण्यासाठी बंदी घातली, व तशा प्रकारचे फलक लावले,याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी,(घुघुस)पत्रकार नासिर खान,प्रा, अशोक डोईफोडे, धर्मराज मुंढे,तथा पोलीस विभागाचे व सिंचाई विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सध्या या परिसरात गडचांदूर येथून बरेच नागरिक गणेश विसर्जन करिता सहपरिवार मोठ्या संख्येने येत आहेत, लहान मुले मोठ्या संख्येने असतात, तेव्हा प्रत्येक जबाबदार व्यक्ती ने काळजी घेतली तर दुर्घटना टळू शकतात.