जेट एअरवेज अडीच वर्षांनंतर पुन्हा उड्डाणासाठी सज्ज, तोट्यामुळे होती विमानसेवा बंद

लोकदर्शन👉 मोहन भारती

 

जेट एअरवेजची विमाने लवकरच विमानतळाच्या धावपट्टीवरून पुन्हा उड्डाण करताना दिसतील. कंपनीच्या मते, जेट एअरवेजची उड्डाणे २०२२ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करतील. तसेच सध्या परदेशी उड्डाणे केवळ कमी अंतराची असतील. एअरलाइनचे म्हणणे आहे की, ते फ्लाइट स्लॉट आणि इतर समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग फ्लाइटसाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

यूएईचे व्यापारी मुरारीलाल जालान हे लंडनस्थित जालान कॉर्लक कन्सोर्टियमचे अग्रणी सदस्य आणि प्रस्तावित जेट एअरवेजचे गैर-कार्यकारी सदस्य आहेत. जालान यांचे म्हणणे आहे की, “आम्ही तीन वर्षात ५० हून अधिक विमानांची  योजना आखत आहोत, जी ५ वर्षात १०० च्या वर पोहोचेल. समूहाकडे दीर्घकालीन व्यवसाय योजना देखील आहे.”

जालान म्हणाले की, “विमान उद्योगात हा इतिहास आहे की दोन वर्षांपूर्वी व्यवसाय बंद पडेलेल्या विमान कंपनीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. आम्ही या ऐतिहासिक उड्डाणात सहभागी होण्यास तयार आहोत.”

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *