गडचांदूर :सध्या कोविड बरोबरच डेंगू ने देखील तोंड काढले आहे अश्या परिस्थितीत रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे. याचेच भान राखत साई शांती युवा गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद मंडळा कडून व्यक्त करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक अरविंद डोहे यांनी केले. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रासकर सर, पाचभाई सर, बोंडे सर, वरारकर सर, गायकवाड सर, दीपक खेकारे,लीलाधर मते, प्रणित अहीरकर, विनोद टोगे, व रक्तपेढी चंद्रपूर येथील डॉ गावीत, डॉ पाचारणे सह चमू उपस्थित होता. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी वैभव राव, नीलेश चिने, सुमीत नागे, अभिजीत पाचभाई, गौरव राव, आकाश गायकवाड, मयूर येडमे, सूरज बोबडे, अक्षय मेश्राम, अतुल बोबडे, संकेत बोधे, सुहास बोंडे, दत्तू पानघाटे,समीर येडमे, अंकित जाधव, संकेत लांडे, उकल बोधे, नितीन टावरी, तन्मय पानघाटे, यश वैद्य,नीरज मालेकर, पवन चौहान, विपुल जोगी यांनी मेहनत घेतली.
Related Posts
काँग्रेस सर्व जाती-धर्मांना एकत्रित घेऊन चालणारा पक्ष -.- उत्तम पेचे
। लोकदर्शन👉 मोहन भारती सोनुर्ली (वनसडी) येथे काँग्रेसचे ‘गाव चलो अभियान’ कोरपना – स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. काँग्रेसमुळेच देशाची एकत्रित मूठ बांधल्या गेली आहे. काँग्रेस सर्व जाती-धर्मांना…
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदुर :-महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व सलग्निक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्या आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन, सातवा वेतन आयोगाचा आजपर्यंतचा फरक, याबाबतच्या शासन विरोधी धोरणाच्या विरोधात कृती…
मुरली सिमेंटच्या वतीने जिल्हाधिकारी यांना 50 हजार सिरिन्ज सुपूर्द
By : Mohan Bharti गडचांदूर : मुरली दालमिया सिमेंटच्या वतीने,सामाजिक बांधिलकी स्वीकारत कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी 50 हजार सिरिन्ज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,यांच्याकडे सुपूर्द केल्या, याप्रसंगी मुरली सिमेंट चे वरिष्ठ महाप्रबंधक सुनील भुसारी,वरिष्ठ प्रबंधक हरगोविंद सिंह…