लोकदर्शन👉 मोहन भारती
🔸राजुरा येथे काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.
राजुरा :– अखिल भारतीय काँग्रेस कमेटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ए. आय. सी. सी चे महासचिव तथा सी. डब्लू. सी सदस्य सचिन राव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि ए. आय. सी. सी. डेलिकेट तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा येथे राजुरा विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मृणालजी पंत यांनी सांगितले की, स्वतंत्र भारत आणि समर्थ भारत निर्माण करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. विविध राजे रजवाडे, जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, भाषा यात विभागलेल्या भारताला राष्ट्रीय एकात्मतेच्या अतुट धाग्यात गुंफण्याचे काम केले. यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बलिदान दिले आहे. तेव्हा आणि तेव्हाच अखंड, विकसित भारत देश निर्माण झाला आहे. आजच्या परिस्थितीत पून्हा एकदा भारताच्या एकात्मतेला, धर्मनिरपेक्षतेला, प्रगतीला खिड घालण्याचे काम सुरू आहे. या दमनकारी, विनाकारी शक्तींच्या तावडीतून देशाला मुक्ती मिळून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना सज्ज व्हायचे आहे असे आवाहन केले. तर उद्घाटनपर मार्गदर्शनात आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यात काँग्रेस पक्षाचे आचार विचार पोहचविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. सर्व सामान्यांना दारिद्र्याच्या, महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करीत आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाला, पक्षाच्या कार्यक्रमाला सहकार्य करणे काँग्रेस कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
या शिबिरात विशेष मार्गदर्शक म्हणून मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव ब्रिजभुषणजी पांडे, मृणालजी पंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अमरजी खानापूरे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे राजुरा तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जिवती तालुकाध्यक्ष गणपत आडे, महिला काँग्रेसच्या गोंडपिपरी तालुकाध्यक्षा रेखा रामटेके, जिवती तालुकाध्यक्षा नंदाताई मुसने, कोरपना तालुकाध्यक्षा ललिता गेडाम, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेस ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सं. गां. नि. यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, उमेश राजूरकर, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष एजाज अहमद, नगराध्यक्ष संगीता टेकाम, आशिष देरकर, विक्रम येरणे, देविदास सातपुते, सचिन फुलझले, सिताराम मडावी, कंटु कोटनाके यासह राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस, सेवादल काँग्रेस, ओबीसी विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, अनु जाती अनु जमाती विभाग काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिजीत धोटे यांनी मानले.