लोकदर्शन 👉 मोहन भारती
“जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते..” असं विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात सध्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. शिवाय, भाजपाच्या काही नेत्यांनी जावेद अख्तर यांना थेट अल्टिमेटही दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.
“मला असं वाटत हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. नेहमीच देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. हेच वाक्य तालिबानमध्ये जाऊन, त्यांनी अशा पद्धतीचं एखादं वाक्य वापरलं असतं तर चौकात त्यांना तालिबानी लोकांनी फटके मारले असते.” असं सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.
जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारत्तात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबान मध्ये केले असते तर त्यांना चौकात फटके मारले असते.. @BJP4Maharashtra @abpmajhatv #JavedAkhtar pic.twitter.com/0BpJYsb4r1
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 6, 2021
तसेच, “या ठिकाणी जर या संस्था आणि संघटना या तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या, तर जसं अफगाणिस्तानच्या एखाद्या चौकात उभा राहून तालिबान्यांना शिव्या दिल्यानंतर, काय हाल होता हे तुम्ही पाहिलं असेल. तसे हाल इथं झाले नसते? पण इथे त्यांच्या या वक्तव्याची काही लोकांनी, मीडियामध्ये देखील मोठ्याप्रमाणावर नोंद घेतली. याचा अर्थ इथे देशात ज्यांची सत्ता आहे, ते रामराज्य आणण्याची कल्पना करणारे लोक आहेत. बजरंग दला