शिक्षक हा नवनिर्मिती व नवसंशोधनाचा खरा शिल्पकार. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

♦️इंडियन रिसर्च संस्थेतर्फे शिक्षक दिनी राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न.

राजुरा(ता.प्र) :– -विदर्भाच्या भूमीत आणि माणसात उपजत आणि मौल्यवान गुणांची अनेक क्षमतांची ताकद असून या भूमीमध्ये संशोधनासाठी प्रचंड वाव आहे आणि म्हणून संस्थांनी आणि शिक्षकांनी समाजाच्या विकासासाठी आणि उच्च शिक्षणासाठी दिशावर्धक व्हावे. ज्ञानाची भूक भागवण्याचे आणि संशोधनाचे उत्तम स्त्रोत व वाहक म्हणून या नवनिर्मित इंडियन रिसर्च संस्थेने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करीत आजचा शिक्षकच हा नवनिर्मितीचा आणि नवसंशोधनाचा खरा शिल्पकार आहे,असे प्रतिपादन भारतातील आंतरराष्ट्रीय परराष्ट्र संबंधाचे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी राष्ट्रीय वेबिनार प्रसंगी केले आहे. यावेळी डॉ. देवळणकर यांनी तालिबान व भारतातील संबंधावर ही प्रकाश टाकला. इंडियन रिसर्च अँड एज्युकेशनल फाऊंडेशन वर्धा यांच्यावतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात शिक्षकांची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयावर आभासी पद्धतीने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर व चर्चा सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध राजकीय विश्लेषक व नागपूर येथीलश्री. बिंझाणी नगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संदीप तुडूंरवार हे उपस्थित होते.यावेळी डॉ. विवेक बेल्हेकर म्हणाले आंतरशाखीय संशोधन है परिवर्तनशील आणि कालसापेक्ष असावे. संशोधन संस्थांनी आणि शिक्षकांनी आपल्या संशोधनामध्ये गुणवत्ता जपली पाहिजे. आपण विद्याशाखेचे नाहीतर समस्यांचे विद्यार्थी आहोत आणि या समस्यांचा संबंध मानवी जीवनाशी असतो आणि म्हणून संशोधन हे मानवी जीवनाच्या विकासात योगदान देणारे ठरावे असे प्रतिपादन डॉ. बेल्हेकर यांनी केले. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ.संदीप तुडूंरवार यांनी संशोधका कडून काही अपेक्षा अभिप्रेत केल्या. ते म्हणाले संशोधकाची भूमिका ही निरपेक्ष असली पाहिजे. संशोधकांनी स्वतः आपल्या ज्ञानाच्या कक्षा विकसित केल्या पाहिजे. सत्याची उकल करणे हा संशोधनाचा मुख्य गाभा आहे. संशोधकाने वैश्विक संदर्भाचा आधार घेत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. तरच संशोधनाची ओढ सत्य आणि प्रामाणिक समजली जाईल व संशोधन समाजाच्या उन्नतीसाठी ठरेल असा आशावाद यावेळी व्यक्त केला.
सुरुवातीला इंडियन रिसर्च अँड एज्युकेशनल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. संदीप काळे व सचिव डॉ. मंगेश आचार्य यांनी संस्थेच्या कार्यप्रणाली विषयी व उद्देशांची माहिती विशद करून संस्थेच्या भविष्यातील विजन मिशन आणि योजनांचा आढावा घेतला. या संपूर्ण चर्चासत्राचे उत्कृष्ट संचालन तज्ञांच्या विविध संदर्भाचा मागोवा घेऊन चर्चासत्राचे आयोजक डॉ. संतोष डाखरे यांनी केले तर परिषदेतील तज्ञ मार्गदर्शकांचा परिचय व जीवनपट आयोजन सचिव डॉ. दिपाली घोगरे यांनी मांडला. तर या चर्चासत्रातील सर्व तज्ञ मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार संस्थेचे सहसचिव डॉ.रवी धारपवार यांनी मानले यावेळी इंडियन रिसर्च संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य व महाराष्ट्रातील व बाहेरील विद्यापीठाचे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आभासी पद्धतीने आयोजित सेमिनार मध्ये सहभागी झाले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *