By : Shankar Tadas
गडचांदूर : सावित्रीबाई फुले विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर ला ‘ शिक्षकदिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या सभागृहामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा तसेच संस्थेचे संस्थापक सचिव स्व. हरिभाऊ डोहे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या निमित्याने वर्ग 5 वी ते वर्ग 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्या स्पर्धेचे आयोजक प्रा. दिनकर झाडे सर, श्री बावनकर सर आणि श्रीमती शेंडे मॅडम होत्या.यामध्ये शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक श्री संजय गाडगे सर, प्रा.वांढरे सर , प्रा. जहिर सर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुखपाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक महेंद्रकुमार ताकसांडे, सूत्रसंचालन प्रा. दिनकर झाडे यांनी केले तर आभार प्रा. नितीन सुरपाम यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृन्द, प्राध्यापकवृन्द , तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कोरोना नियमाचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.