लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
कोविड -19 आजाराच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका विचार करता कोरपना तालुक्यातील सर्व 18 वर्षावरील वयोगटातील लोकांनी कोविड -19 आजाराचे लसीकरण स्वयंपूर्ती ने करावे. तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रशासन व आरोग्य विभाग यांचे योग्य समन्वय असल्यामुळे तालुक्यातील पहिल्या डोज चे काम 65% काम झालेले आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांनी दिली
18 वर्षे वरील लाभार्थी ची संख्या 90588 असून आतापर्यंत 58757 नागरिकांनी कोविड चा पहिला डोज घेतला आहे,
कोरपना तालुक्यातील कोविड मुक्त 25 गावातील 18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून कोरपना तालुक्यातील एकूण 28 लसीकरण केंद्रावरून आजपावेतो 74हजार 290 नागरिकांचे लसीकरण झाले आहे,
कोरपना तालुक्यातील लसीकरण करिता अंबुजा सिमेंट फाउंडेशन, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, व दालमिया सिमेंट कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ, स्वप्नील टेम्भे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी ला सांगितले,