लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
नवी दिल्ली :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे लोकप्रियतेच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असतात. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये नरेंद्र मोदी हे प्रथम स्थानावर आल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ग्लोबललीडर अॅप्रुअल रेटींमध्ये (Global leader approval rating) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात प्रथम स्थान मिळवले आहे. नरेंद्र मोदी यांनी या सर्व्हेमध्ये अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडाच्या अनेक नेत्यांना मागे टाकले आहे. नरेंद्र मोदी हे या सर्वेमध्ये 70 टक्के रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहेत, तर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक जागतीक पातळीवरील नेत्यांचे रेटिंग मोदींच्या तुलनेत कमी आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल रेटिंगच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरसुद्धा नाहीत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर 64 टक्के रेटिंगसह मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर तिसऱ्या स्थानावर इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी 63 टक्के रेटिंगसह आहेत. त्यांच्यानंतर जर्मनचे चान्सेलर अँजेला मर्केल यांना 52 टक्के आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना ४८ टक्के रेटिंग मिळाले आहेत.
द मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult) या संस्थेने सर्वे केला असून ही एक अमेरिकन डेटा इंटेलिजन्स संस्था आहे. ही संस्था ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, आणि अमेरिकेतील मधील राजकीय नेत्यांच्या जागतिक स्तरावरील लोकप्रियतेचा सर्व्हे करत असते.