लोकदर्शन 👉 मोहन भारती
👉 अशोकराव चव्हाण धावून आले रात्री दोन वाजता मदतीला 31 ऑगस्टला मध्यरात्री चाळीसगाव घाटामधून संभाजीनगर कडे काही शिवसैनिक येत होते अ चानक रात्री बारा वाजता त्यांच्या गाडीसमोर चालत असलेल्या ट्रकवर दरड कोसळली आनी ट्रक खाली गेला बघता बघता प्रचंड पावसासोबत दरड कोसळलत होती विजा चमकायला लागल्या भयंकर कोलकोट अंधारात मृत्यू जणू डोळ्यासमोर उभा होता
📍 अशा अवस्थेमध्ये कोणीतरी मदत करावं म्हणून शिवसेनेचे शाखाप्रमुख मयूर राजेंद्र कंटे यांनी अनेकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला रात्र फार असल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही शेवटी 100 नंबर ला फोन केला तर आपण सार्वजनिक बांधकाम विभागात फोन करा असा सल्ला मिळाला त्या विभागात कोणाला फोन करावे हे कळत नव्हते तर मोबाईल मध्ये सेव असलेला अशोकराव चव्हाण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा नंबर दिसला आणि लगेच रात्री एक वाजता त्यांना फोन लावला विशेष म्हणजे
📍 अशोक राव चव्हाण यांनी इतक्या रात्री स्वतः फोन उचलला आणि मी अशोकराव चव्हाण बोलतोय बोला काय आहे असे विचारले त्यावर घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगितला आम्ही जगू का मरू याची शाश्वती नाही पण साहेब तिथे फार लोक अडकले त्यांना मदत करा असे मयूर भाऊ बोलले त्यानंतर तुम्ही घाबरू नका मी सर्व मदत करतो असे बोलून अशोकराव चव्हाण यांनी धीर दिला आणि यंत्रणा हलवली बघता बघता कलेक्टर असेल कमिशनर असेल तसीलदार असेल सगळ्यांची फोन यायला सुरुवात झाली आणि परिस्थिती किती गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आले
📍 सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली त्या ठिकाणचे स्थानिक आमदार मंगेश चव्हाण मदतीसाठी धावून आले वेळेवर संबंधित विभागाच्या मंत्र्याला गांभीर्य लक्षात आल्या मुले प्रशासनान लोकांना मदत करू शकले घाटाच्या खाली प्रचंड पूर आलेला होता अनेक गुरेढोरे वाहून गेली उभा पीक डोळ्यासमोर वाहतांना बघितलं आणि साक्षात मृत्यू काय असतं याची जाणीव झाली पण एका गोष्टीचा अभिमानही वाटला की महाराष्ट्र राज्यामध्ये असे अनेक मंत्री आहेत रात्री-बेरात्री या सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून येतात एक नागरिक म्हणून एक शिवसैनिक म्हणून मी अशोकराव चव्हाण आणि संपूर्ण प्रशासनाचे मनापासून आभार मानतो जय महाराष्ट्र शिवसेना शाखाप्रमुख नागेश्वरवाडी भोईवाडा वार्ड क्रमांक 52 मयूर राजेंद्र कंटे योगेश डहाळे उप विभाग प्रमुख विनय लाहोट सामाजिक कार्यकर्ते संभाजीनगर