लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा:– आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे क्षेत्रातील तालुका क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. यानुसार क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी येथे तालुका क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये निधी मंजूर केला. येथे निर्माण कार्य सुरू आहेत. आज आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथील तालुका क्रीडा संकुल येथे भेट देऊन निर्माण कार्याची पाहणी केली व आढावा घेतला. तसेच संबंधित सर्व कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश दिले.
या प्रसंगीं नगराध्यक्ष अरुण धोटे, तहसीलदार हरीश गाडे, तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाले, योगिता मटले, पंकज आहुजा यासह क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.