लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक 29 ऑगस्टला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, वरील दिनाचे औचित्य साधून क्रीडाविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व स्वर्गीय डोहेगुरुजी यांना अभिवादन करून करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद वांढरे ,महेंद्रकुमार ताकसांडे, सुरेश पाटील, एन के बावनकर ,जी एन बोबडे ,कु. माधुरी उमरे ,विद्या शंभरकर, (कांबळे)शशिकांत चन्ने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी क्रीडा दिनानिमित्त उपस्थितांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व व्यायामाचे फायदे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षक राजेश वासेकर यांनी केले तर आभार राजेश मांढरे यांनी मानले .सदर कार्यक्रमात ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद होता.