लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,
गडचांदुर –
गडचांदुर येथील ग्राहक सेवा केंद्र चे संचालक मो.रफिक शेख याचे व्यवस्थापक मो.फैज यांना नुकतेच सन्मानित.केले, भारतीय स्टेट बँक ने ग्रामीण भागातील नागरिकांना,महिला व मुला मुलींना विविध सेवा पुरवण्या करीता ग्राहक सेवा केंद्राची सेवा सुरू केली आहे येथे, विधवा महिला,पेंनशन धारक यांना सुद्धा सुविधा प्रदान केली जात आहे.नुकतीच चंद्रपूर येथे एक सभा जिल्यातील सर्व ग्राहक सेवा संचालकांची झाली ,तिथे आलेल्या अधिकाऱ्यांनी बँकेत आलेल्या योजना सांगितल्या व सर्वाँना निश्चित ध्येय ठरून दिले त्या नुसार प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जो ग्राहकांना वार्षिक बारा रुपयात दिला जातो.त्यात दोन लाख चा बिमा सुरक्षा असते, तसेच दुसरी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ज्यात तीनशे तीस रुपये वार्षिक भरल्या नंतर एक वर्षासाठी दोन लाखांचा जीवन विमा दिला जातो तर अटल पेन्शन योजना यात अस्थाई कामगारांना अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील नागरिकांनी काही कमी रक्कम दर महिना जमा केल्यास वयाच्या साठ वर्षां पासून दर महिना एक हजार ते पाच हजार पेन्शन मिळण्याची योजना आहे. अश्या विविध योजना प्रभावी पणे राबविणाऱ्या ग्राहक सेवा संचालकांना नुकतेच नागपूर येथील एरिया जनरल मॅनेजर श्रीमती अगस्थी याचे हस्ते चंद्रपूर येथे सन्मानित करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यात ह्या योजना जास्तीत जास्त राबवण्याचे आव्हान अवस्थी यांनी केले. या वेळी अधिकारी प्रवीण कामडे ,सुधांशू पती व अन्य ग्राहक सेवा केंद्र चे संचालक हजर होते
,