लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सी डी सी बँकेचे माजी संचालक तथा राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष दादा पाटील लांडे यांची जिल्हा काँग्रेसच्या नियोजन समिती वर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजुरा तालुका काँग्रेसचे ते जेष्ठ नेते असून अनेक वर्षांपासून ते काँग्रेस पक्षात काम करीत आहेत. एक निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, काँग्रेस ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार तसेच काँग्रेसच्या विविध शाखेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.