कोरपना कृषिविभागाचा उपक्रम
शेतकऱ्यांना केलें मार्गदर्शन
अंबुजाकडून फवारणी कीड वाटप
गडचांदूर – ग्रामपंचायत निमणी कृषिविभाग कोरपना व अंबुजा फाउंडेशन उप्परवाही यांच्या संयुक्त विद्यमाने निमणी येथील प्रभाकर पाटील यांच्या शेतातील बांधावर शेतीशाळेची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी निमणी ग्रामपंचायत उपसरपंच उमेश राजूरकर कृषिसहायक डी बी भगत प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम रंजित गौरकार श्यामराव दोरखंडे प्रभाकर पाटील विवेक चांदेकर वसंता सावरकर विक्रम गौरकार निलेश पाटील प्रफुल मोरे किसन सावरकर सौरभ ढवस प्रशांत गोरे आदी उपस्थित होते. कृषिसहायक अधिकारी भगत म्हणाले की ज्या शेतात सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळी उंट अळी खोड माशी चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी नियंत्रणासाठी इमामेकटीन बेंझोएट १.९ इसी ८.४ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच पिकांच्या नियंत्रणासाठी पक्षी थांबे कामगंध सापळे बांधावे असे सांगितले प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम म्हणाले की शेतकऱ्यांनी निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार किड नियंत्रांचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते असे सांगून गटाविषयी माहिती दिली. उपसरपंच उमेश राजूरकर यांनी सांगितले की शेतिशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांच्या मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा करु शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो. तर दोन तास चाललेल्या शेती शाळेबद्दल निमणी येथील शेतकऱ्यांनी कोरपना कृषि विभाग व अंबुजा फाउंडेशन उपरवाही यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.