आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मृतकांच्या कुटूंबियांना केला धनादेश सुपुर्द
दुर्गापूर येथे दिनांक १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासह कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मुत्यु झाल्याच्या घटनेतील मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य प्रदान करावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.
दुर्गापूर येथील रहिवासी श्री. रमेश लष्करे यांनी रात्री ११.०० वाजताच्या सुमारास घरातील जनरेटर सुरू करून सर्व झोपलेले असताना जनरेटरचा धूर बाहेर पास न झाल्याने गुदमरून कुटूंबातील रमेश लष्करे, अजय लष्करे, लखन लष्करे, कृष्णा लष्करे, माधुरी लष्करे, पुजा लष्करे या सहा जणांचा मृत्यु झाला. तातडीने मृतकांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री निधीतुन अर्थसहाय्य मिळावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याचा पाठपुरावा केला .त्यानुसार सदर प्रकरणी 6 लाख रु चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधितुन मंजूर करण्यात आले आहे.
आ. मुनगंटीवार यांनी आज लष्करे कुटुंबियांची भेट घेत 6 लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द केला . यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह , जिप सदस्य रोशनी खान , पंचायत समिति सभापती केमा रायपूरे ,संजय यादव, हनुमान काकड़े , मुक्ता येरगुडे, लक्ष्मी सागर ,अंगद सागर , श्रीनिवास जनगम आदिंची उपस्थिति होती.